Category: स्थानिक वार्ता
कोरेगाव भिमा येथे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आढळणारा प्राणी सिंह नव्हे तर बिबट्याच – स्मिता राजहंस
कोरेगाव भीमा, ता. २० : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे गव्हाणे वस्तीवरील पोपट गव्हाणे यांच्या घरासमोर सिंह सदृश्य प्राण्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज वायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान वन विभागाने मात्र सीसीटीव्ही फुटेज नुसार हा सिंह नसून बिबट्याच असल्याचे…
शिरूर तालुक्यात स्थानिकांच्या रोजगार व पूरक व्यवसायाबाबत सणसवाडी येथे युवकांचे रोजगार एल्गार आंदोलन
लवकरच स्थानिकांच्या रोजगाराची दिशा जाहीर करणार – संजय पाचंगे कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे मोठ्या संख्येने औद्योगिक क्षेत्र विकसित झाले असून, चार आंतरराष्ट्रीय आणि इतर जवळपास दोनशे छोट्या-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीची ना हरकत घेताना ३० टक्के रोजगार व पूरक व्यवसाय हिस्सा हा स्थानिकांनाच देवू अशी लेखी ग्वाही दिली…
धक्कादायक ! कोरेगाव भिमा येथे सिंह सदृश्य प्राण्याने केली कुत्र्याची शिकार…
सी सी टी व्ही फुटेज मध्ये सिंह सदृश्य प्राणी आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे गव्हाणे वस्तीवरील पोपट गव्हाणे यांच्या घरासमोर सिंह सदृश्य प्राण्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याचे सी सी टी व्ही मध्ये दिसत असल्याने नागरिकांमध्ये सिंहसारखा प्राणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावत संबधित प्राण्याला पकडण्याची…
तळेगाव ढमढेरे येथे महिंद्रा फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या त्रासाने अखेर त्याने आयुष्यच संपवले..!
घर गहाण ठेवायला लावले.. हप्तेही भरून घेतले आणि कर्ज नाकारल्याने फायनान्स कंपनीच्या त्रासाने अखेर त्याने आयुष्यच संपवले..! तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून फायनान्स कंपनीने कर्जासाठी घर गहाण ठेवूनही कर्ज न देताही कर्ज हप्त्यांच्या तगादा लावल्यामुळे व नियमानुसार सुरवातीचे काही हप्ते भरून घेतले. परंतु, कर्ज न देता त्रास दिल्याने हरिभाऊ…
बेघर वृद्धाला दिला मायेचा आधार: सरपंच रमेश गडदे आणि समस्या-उपाय ग्रुपचे माणुसकीचे दर्शन
शिक्रापूर (ता.शिरूर) येथील एसटी स्टँड परिसरात चार-पाच दिवसांपासून भटकणाऱ्या निराधार वृद्धाला शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपच्या सदस्यांनी आणि सरपंच रमेश गडदे यांनी मायेचा आधार दिला. हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीत असाहाय्य अवस्थेत असलेल्या या वृद्धाची विचारपूस केल्यानंतर त्यांना कुठलाही आधार नसल्याचे समोर आले.यावेळी आदर्श सरपंच रमेश गडदे व समस्या व उपाय ग्रुपच्या सदस्यांनी वृद्धाला सणसवाडी येथील माहेर…
शिक्रापूरचे माजी उपसरपंच गिलबिले यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला पोलिसांनी १२ तासांत ठोकल्या बेड्या
शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कोयाळी गावठाण (ता. शिरूर) येथील हिवरे रस्त्यावर रविवारी (ता.१) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दत्तात्रय गिलबिले यांची हत्या पुर्ववैमनस्यातून झाली असून शिक्रापूर पोलिसांनी आरोपी पप्पु नामदेव गिलबिलेला अटक करण्यात आले असून शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या…
मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! नव्या पिढीच्या हक्कांचा आदर करा – शांतीलाल मुथ्था
पुणे– “जैन समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुलं वयाच्या २०व्या वर्षी पोहोचल्यावर त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला पाहिजे. मात्र, अट अशीच असेल की जोडीदार आपल्या समाजातीलच असावा,” असे मार्मिक आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले. पुण्यात आयोजित भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात मुथ्था बोलत…
दौंडमध्ये एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला तर दुसऱ्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दौंड तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भीमा नदीचा पट्टा आणि पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे वास्तव दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (दि. १) पहाटे यवत रेल्वे स्टेशनजवळ एका बिबट्याला रेल्वेची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वन्यजीवांसाठी चिंताजनक असून, शेतकरी आणि शेतमजूर भयभीत झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड,…
धक्कादायक ! शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांचा धारदार शस्त्राने केला खून
मानेवर वर्मी घाव, घटना स्थळी व परिसरात शिक्रापूर पोलिसांचा बंदोबस्त शिक्रापूर (ता. शिरूर) येथील माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर अंदाजे ३५ वर्षीय इसमाने धारदार शास्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली आहे.(A shocking incident has taken place in which a 35-year-old…
बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये भरपाई मिळणार…
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, जायबंदी अथवा ठार झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. विशेषतः बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये भरपाईपोटी देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्यांपर्यंत त्याने हल्ले केल्याच्या बातम्या सतत येतात. बिबटे अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये येतात. शेतकऱ्यांची पाळीव जनावरे, वस्त्यांवरील भटकी कुत्री यांच्या शिकारी करतात.जिल्ह्याच्या पश्चिमेकडील…
