Category: स्थानिक वार्ता
पै.किरण साकोरेंच्या प्रयत्नांनी सोनवणे वस्ती विजेच्या प्रकाशात झळकली, १२ वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी
अंधाराचे साम्राज्य दूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण; पै.किरण साकोरे यांच्या विकासकामाचे सर्वस्तरातून कौतुक लोणीकंद (ता. हवेली) हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथील सोनवणे वस्ती गावठाण परिसरात गेल्या तब्बल बारा वर्षांपासून प्रलंबित असलेला वीज पुरवठ्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. युवा नेते पै. किरण साकोरे यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला असून, यामुळे परिसरात समाधान…
निसर्गऋण!मायेची पाखर! ज्वारीच्या शेतात फिरणार नाही गोफण, दिपाली शेळके व कुटुंबीयांचे पाखरांना ज्वारी खाण्यासाठी मुक्त निमंत्रण
शिरूरच्या दिपाली शेळके व कुटुंबियांनी पाखरांसाठी खुलं केलं दोन एकर ज्वारीचं रान, गोफण थांबली, माणुसकी बोलू लागली प्रतिनिधी राजाराम गायकवाड पिंपळे (खालसा) वाढती महागाई, खतांचे गगनाला भिडलेले भाव आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी सध्या चिंतेत असतानाच, शिरूर तालुक्यातील एका शेतकरी दांपत्याने माणुसकी आणि निसर्गप्रेमाचा अनोखा ‘मळा’ फुलवला आहे. पिंपळे (खालसा) येथील बाळासाहेब शेळके आणि दिपाली…
राजपथ ते कर्तव्यपथ: वाघोलीतील बीजेएसच्या स्वराज भंडारेला राष्ट्रपतींना सलामी देण्याचा बहुमान
वाघोली, (ता. हवेली): नवी दिल्ली येथे होणाऱ्या २६ जानेवारी २०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा एनसीसी कॅडेट स्वराज भंडारे याची निवड झाली आहे. देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या संचलनात कर्तव्यपथावर मार्च करत स्वराज राष्ट्रपतींना सलामी देणार असून, त्याच्या या यशामुळे शिरूर तालुका व पुणे जिल्ह्याच्या…
धक्कादायक! कोरेगाव भीमा येथे भीषण अपघात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
पोलिस भरती करण्यासाठी आलेल्या युवकाचा दुर्दैवी अंत, पुणे-नगर महामार्गावर रक्ताचा सडा कोरेगाव भीमा (ता.शिरूर) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज सायंकाळी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वाडा पुनर्वसन फाट्याजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात मोठ्या वाहनाने (टेम्पो) दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला…
सक्षम भारतासाठी तरुणाईची सक्षमता महत्त्वाची : डॉ. देवानंद शिंदे
कान्हूर मेसाईत कर्वे समाजसेवा संस्थेचे पाच दिवसांचे शिबिर उत्साहात संपन्न कान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रो. डॉ. देवानंद शिंदे यांनी केकान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम…
शिक्रापूर येथे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेविकांचा गौरव
शिक्रापूर (ता.शिरूर) येथील आधार फाउंडेशन आणि विद्याधाम प्रशाला यांच्या वतीने शिक्रापूरमधील आरोग्य सेविकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समाजासाठी आरोग्य सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला दाद देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक गंगावणे होते. यावेळी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष खैरे, डॉ. प्रतीक्षा आठवले, आरोग्य सहायिका अवनी आल्हाट, सुजाता खैरे, पल्लवी…
शिक्रापूर ग्रामपंचायत वाचनालयाच्या उपक्रमाचे जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून कौतुक
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता.शिरूर) ग्रामीण भागातील वाचन संस्कृती टिकवण्यासाठी शिक्रापूर ग्रामपंचायतीने राबवलेली वाचनालय चळवळ अत्यंत स्तुत्य आहे, असे गौरवौद्गार पुणे जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी काढले. शिक्रापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता, त्यांनी वाचनालयाच्या सुसज्ज ग्रंथालयातील सर्व अभिलेखांची पाहणी केली. ग्रामीण भागातही वाचनालय चळवळ उत्तम प्रकारे सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले….
रुग्णसेवेचा महायज्ञ! पै. किरण साकोरे यांच्या माध्यमातून भव्यदिव्य ‘मोफत महाआरोग्य शिबिराचे ‘ आयोजन
प्रदिपदादा कंद युवा मंच व पैलवान किरण साकोरे मित्र परिवाराच्या वतीने लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी भव्य मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे भव्यदिव्य आयोजन लोणीकंद (ता. हवेली): भक्ती, सेवा, समर्पण आणि विकासाच्या बाबतीत आघाडीवर असणारे पै. किरण संपत साकोरे आता समाजसेवेच्या मैदानातही अग्रेसर ठरले आहेत. प्रदीपदादा कंद युवा मंच व किरण संपत साकोरे…
वाघोलीत वक्तृत्वाचा जागर; ‘बीजेएस’ राज्यस्तरीय स्पर्धेत सिद्धी बाफना प्रथम
वाघोली (ता.हवेली) भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात १८ वी स्व. पी. सी. नाहर स्मरणार्थ ‘मुक्तचिंतन’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. नागपूरपासून नेवाशापर्यंतच्या २२ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. नेवाशाच्या सिद्धी बाफना (जिजामाता कॉलेज) प्रथम क्रमांक, वसुधा पाटील (देसाई कॉलेज, पुणे) हिने द्वितीय तर नागपूरच्या अनिकेत वनारे (संताजी कॉलेज) याने तृतीय क्रमांक…
शिक्रापूर: मलठणफाटा-गणेगाव रस्ता खड्ड्यात; दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता.शिरूर) येथील मलठण फाटा ते गणेगाव खालसा या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, या रस्त्याची तातडीने डांबरमिश्रित खडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड यांनी केली आहे. मलठण फाटा हा परिसर व्यापारीदृष्ट्या अत्यंत गजबजलेला चौक आहे. येथून बुरुंजवाडी, गणेगाव खालसा, वाघाळे आणि मलठण या…
