शिक्रापूर ग्रामपंचायत वाचनालयाच्या उपक्रमाचे जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून कौतुक
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता.शिरूर) ग्रामीण भागातील वाचन संस्कृती टिकवण्यासाठी शिक्रापूर ग्रामपंचायतीने राबवलेली वाचनालय चळवळ अत्यंत स्तुत्य आहे, असे गौरवौद्गार पुणे जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी काढले. शिक्रापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता, त्यांनी वाचनालयाच्या सुसज्ज ग्रंथालयातील सर्व अभिलेखांची पाहणी केली. ग्रामीण भागातही वाचनालय चळवळ उत्तम प्रकारे सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले….
