स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; सरणाच्या लाकडावरून फुटली खुनाला वाचा
गावात कोणाचा मृत्यूच झाला नाही, पण स्मशान भूमीत कुणाचे प्रेत जाळले यावरून संशय..काही अंतरावर रक्ताचे डाग… तावशी (ता.इंदापूर) येथील स्मशानभूमीमध्ये जाळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा तपास वालचंदनगर पोलिसांनी लाकूड व हाडाच्या राखेवरून लावून खून करणाऱ्या दोघांना अटक केले.चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे खुनाचा तपास लावल्याने ग्रामस्थांना पोलिसांचे कौतुक केले. याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय ३०), विशाल सदाशिव खिलारे (वय…