
माझ्या नावावर पावत्या कशाला फाडतो? घोडगंगा साखर कारखान्यावरून अजित पवारांनी अशोक पवारांना सुनावलं
लोणी काळभोर (ता. हवेली) येथे शिरूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवारांवर निशाणा साधला. घोडगंगा साखर कारखाना बंद पाडल्याच्या प्रकरणावरून अजित पवारांनी अशोक पवारांना खडेबोल सुनावले. “माझ्या नावावर पावत्या का फाडतोस? भावकीचा फायदा घेऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न का करतो आहेस?” अशा स्पष्ट शब्दांत अजित पवारांनी अशोक पवारांना खडे बोल…