कान्हूर मेसाईत कर्वे समाजसेवा संस्थेचे पाच दिवसांचे शिबिर उत्साहात संपन्न
कान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रो. डॉ. देवानंद शिंदे यांनी केकान्हूर मेसाई (शिरूर):”देशाला बलशाली आणि सक्षम बनवायचे असेल, तर आजच्या तरुणाईने शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रो. डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.ले.
कर्वे समाजसेवा संस्था (पुणे) येथील एम.एस.डब्ल्यू. विभागाच्या वतीने कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे पाच दिवसांच्या विशेष समाजकार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
पाच दिवसांत गावकऱ्यांशी साधला थेट संवाद : या शिबिरात समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गावातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी पाणीटंचाई, स्वच्छता, आरोग्य, व्यसनमुक्ती आणि महिला-बालकल्याण अशा विविध विषयांची सविस्तर माहिती घेतली. केवळ माहिती न घेता, पथनाट्ये, प्रेरणादायी गीते आणि मशाल फेरीच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये जनजागृतीही केली.
शेती आणि आरोग्यावर भर : विद्यार्थ्यांनी गावाचा नकाशा तयार करण्यासोबतच, पाऊस, पिके, माती परीक्षण आणि जनावरांचे आजार यांबाबतची तांत्रिक माहिती तक्त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना दिली. या उपक्रमामुळे गावातील समस्या समजून घेण्यास मोठी मदत झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आत्मविश्वास वाढविणारे शिबिर : संस्थेचे संचालक प्रा. डॉ. महेश ठाकूर म्हणाले की, “अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्याचा अनुभव मिळतो. समाजातील विविध घटकांशी कसे बोलावे आणि काम करावे, याची दृष्टी त्यांना मिळते.” तर शर्मिला रामटेके यांनी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य दिपाली शेळके, सरपंच अशिया तांबोळी, समाजसेवक शहाजी दळवी, जहिद आतार, राहुल बिडवे, श्वेता मॅडम, रवी सर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
