३०६ खेळाडूंनी घेतला उस्फूर्तपणे सहभाग
वाघोली (ता. हवेली) : भारतीय जैन संघटनेच्या बी जे एस महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४-२५ हा प्रचंड उत्साहात पार पडला. यावर्षी महाविद्यालयीन प्रांगणात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये ३०६ खेळाडूंनी सहभाग नोंदवून क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशस्वी सहभागामुळे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड व क्रीडा शिक्षक डॉ. रमेश गायकवाड यांनी त्यांना अभिनंदन व्यक्त केले.
स्पर्धेचा दिनांक, स्पर्धा व विजेते :
३ फेब्रुवारी – क्रॉसकंट्री : विजेता : कु. तेजस पवार : उपविजेता : स्वराज भंडारे
४ फेब्रुवारी – व्हॉलीबॉल : उद्घाटन : प्रा. सुभाष शिंदे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख)विजेता : बीए संघ, उपविजेता : बीएस्सी संघ
५ फेब्रुवारी – खो-खो : उद्घाटन : डॉ. बळवंत लांडगे, डॉ. सिध्देश्वर गायकवाड, डॉ. ज्योतिराम मोरे, पुरुष गट : विजेता – बीसीए संघ; उपविजेता – बीए संघ, महिला गट : विजेता – बी.कॉम संघ; उपविजेता – बीए संघ
६ फेब्रुवारी – कबड्डी : उद्घाटन : डॉ. सहदेव चव्हाण (मराठी विभाग), प्रा. विपुल घेमुड विजेता : बीए संघ, उपविजेता : बीएस्सी संघ
७ फेब्रुवारी – क्रिकेट :उद्घाटन : दादासाहेब गावडे (आदर्श सरपंच), डॉ. माधुरी देशमुख, विजेता : प्रथम वर्ष बी.कॉम संघ, उपविजेता : प्रथम वर्ष बीसीए संघ
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीमध्ये डॉ. रमेश गायकवाड, प्रा. दिनेश गायकवाड, डॉ. सचिन कांबळे, प्रा. अंगद साखरे, गिरीषकुमार शहा, म्हस्कू शिंगाडे, कुलदीप रायदास यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा क्रीडा महोत्सव उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
