सणसवाडीत रंगणार शरीरसौष्ठवचा महासंग्राम

Swarajyatimeesnews

सणसवाडीत पै. बाबासाहेब दरेकर व पै. बाळासाहेब दरेकर बंधूंचा ‘फिटनेस’ धमाका; सुनीत जाधव यांच्या उपस्थितीत रंगणार ‘मिस्टर डी.बी. श्री’चा थरार

सणसवाडी (ता.शिरूर) पुणे जिल्ह्यातील शरीरसौष्ठवपटूंच्या पीळदार शरीयष्टीची आणि ताकदीची कसोटी पाहणारी ‘भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा: मिस्टर डी.बी. श्री २०२६’ यंदा सणसवाडीत रंगणार आहे. ‘ड्रीम बिग (डी.बी.) फिटनेस’च्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सणसवाडीतील ग्रामपंचायत रोडवरील मयुरी रेसिडेन्सी येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘मिस्टर इंडिया’ किताब विजेते सुनीत जाधव यांची लाभलेली विशेष उपस्थिती. त्यांच्या उपस्थितीमुळे जिल्ह्यातील तरुण खेळाडूंमध्ये नवचैतन्य पसरले आहे. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना, फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स (पुणे) आणि पिंपरी चिंचवड शरीरसौष्ठव संघटना यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे अत्यंत दिमाखदार नियोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे सदस्य (राज्यमंत्री दर्जा) पै. बाबासाहेब दरेकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेला ‘मिस्टर इंडिया’ सुनीत जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील पीळदार शरीयष्टीचे तरुण आपले कसब पणाला लावणार आहेत. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्या अधिकृत मान्यतेने होणारी ही स्पर्धा शिरूर तालुक्याच्या क्रीडा वैभवात भर टाकणारी ठरणार आहे.

सणसवाडी येथील डी.बी. फिटनेसचे संचालक आणि महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे सदस्य (राज्यमंत्री दर्जा) पै. बाबासाहेब दरेकर तसेच पै. बाळासाहेब दरेकर यांनी या भव्य आखाड्याची तयारी पूर्ण केली आहे. पुणे जिल्ह्यातील दिग्गज शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवणार असून, ‘मिस्टर डी.बी. श्री’चा किताब नेमका कोण पटकावणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

ग्रामीण भागातील तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळावे आणि व्यायामाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे आरोग्य सुदृढ व निरोगी रहावे हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. – पै.बाबासाहेब दरेकर ,आयोजक तथा संचालक, डी.बी. फिटनेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!