प्रदिपदादा कंद युवा मंच व पैलवान किरण साकोरे मित्र परिवाराच्या वतीने लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी भव्य मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे भव्यदिव्य आयोजन
लोणीकंद (ता. हवेली): भक्ती, सेवा, समर्पण आणि विकासाच्या बाबतीत आघाडीवर असणारे पै. किरण संपत साकोरे आता समाजसेवेच्या मैदानातही अग्रेसर ठरले आहेत. प्रदीपदादा कंद युवा मंच व किरण संपत साकोरे मित्र परिवाराच्या वतीने लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेसाठी एका अत्यंत सेवाभावी ‘मोफत महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. “सर्वसामान्य माणसाची सेवा हाच खरा धर्म” या उदात्त भावनेतून पै. किरण साकोरे यांनी या उपक्रमाद्वारे रुग्णसेवेवर विशेष भर दिला आहे.
नागरिकांच्या व रुग्णसेवेसाठी तत्पर:राजकारण म्हणजे केवळ भाषणे वा पदे नव्हे, तर प्रत्यक्ष जनतेच्या उपयोगी येणारी कृती असते, हे पै. किरण साकोरे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सर्वसामान्य जनता, गरीब, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आरोग्याचा मोठा दिलासा मिळावा, या हेतूने तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांचे दुःख कमी करणे ही पैलवान किरण साकोरे यांची भूमिका या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून येते.

शिबिरातील प्रमुख मोफत सोयी-सुविधा:
हृदय व शस्त्रक्रिया विभाग: ECG, हृदयातील छिद्र, व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट आणि ओपन हार्ट सर्जरी यांसारख्या गंभीर आजारांवर मोफत उपचार व मार्गदर्शन.
मोफत तपासण्या: मधुमेह (ब्लड शुगर), रक्तदाब, हिमोग्लोबिन आणि हाडांशी संबंधित सर्व आजारांची सखोल तपासणी.
नेत्रसेवा: मोफत डोळे तपासणीसोबतच मोतीबिंदू तपासणी व गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप.
विशेष उपचार: मुळव्याध, फिस्टुला, फिशर, बद्धकोष्ठता, हर्निया आणि पित्त तपासणीची सुविधा उपलब्ध आहे.
स्त्रीरोग व इतर तपासण्या: महिलांसाठी विशेष मार्गदर्शन, त्वचारोग, पोटाचे आजार आणि श्वसनविकारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार.
MJPJAY योजनेअंतर्गत मार्गदर्शन : या शिबिरात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत अँजिओप्लास्टी, डायलिसिस, कर्करोग शस्त्रक्रिया आणि अवयव प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजारांबाबत नागरिकांना मोफत उपचारांची माहिती व मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
रक्तदानाचा महाकुंभ : आरोग्य तपासणीसोबतच येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी साकोरे मित्र परिवाराकडून आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
शिबिराचा तपशील: दिनांक: सोमवार, २२ डिसेंबर २०२५ ,वेळ: सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० , ठिकाण: गोल्डन पॅलेस, पेरणे टोलनाक्याजवळ
विशेष सुविधा: नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीपासून शिबिराच्या ठिकाणापर्यंत मोफत बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
- अधिक माहितीसाठी संपर्क:
- शहाजी शिंदे – 9860065726
- नवनाथ वागस्कर – 9822641789
- गौरव झुरुंगे – 9922500014
- विनोद गावंडे – 7775864516
