वाघोली (ता.हवेली) भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात १८ वी स्व. पी. सी. नाहर स्मरणार्थ ‘मुक्तचिंतन’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. नागपूरपासून नेवाशापर्यंतच्या २२ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला.
नेवाशाच्या सिद्धी बाफना (जिजामाता कॉलेज) प्रथम क्रमांक, वसुधा पाटील (देसाई कॉलेज, पुणे) हिने द्वितीय तर नागपूरच्या अनिकेत वनारे (संताजी कॉलेज) याने तृतीय क्रमांक पटकावला. प्रथमेश चव्हाण (BMCC) याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद पटकावले.

यावेळी स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय घोडेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवींद्रसिंह परदेशी होते. यावेळी स्वागताध्यक्ष सुरेश साळुंके, प्राचार्या डॉ. मनिषा बोरा, परीक्षक डॉ. प्रकाश पांढरपिसे उपस्थित होते.

सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. भारती जाधव यांनी स्पर्धेचे आयोजन केले. यशस्वीतेसाठी डॉ. सहदेव चव्हाण, डॉ. विपुल घेमुड, प्रा. ज्योती गायकवाड, प्रा. सुप्रिया कासलीवाल, डॉ. संजय गायकवाड, डॉ. एस. व्ही. गायकवाड, डॉ. भूषण फडतरे, श्याम पाटील, गिरीश शहा, डॉ. सचिन कांबळे, गुरव, शिंदे, बटुळे, तिवारी, रामदास, तुषार तसेच दीक्षा, जगताप मॅडम व बोबडे मावशी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सहदेव चव्हाण यांनी केले, प्रास्ताविक प्रा.भारती जाधव यांनी तर आभार डॉ. विपुल घेमुड व सुप्रिया कासलीवाल यांनी मानले.
