जलसंपदा विभागातील कॅनॉल इन्स्पेक्टर पदी निवड
कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील कन्येने आई वडिलांच्या कष्टाचे सोने करत राज्यातील आव्हानात्मक असणाऱ्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब व गट क सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत जलसंपदा विभाग पुणे परिमंडळ, कालवा निरीक्षक पदी कु. आरती संतोष घावटे हिने यश मिळवल्याने तिच्यासह कुटुंबावर अभिनंदाचा वर्षाव करण्यात येत आहे.
कोरेगाव भिमा येथील शेतकरी कुटुंबातील पोलीस प्रशासनात सेवेस असणारे संतोष घावटे यांच्या सुकन्येने अनेक अडथळे, आव्हाने व अपयशावर मात परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवत कोरेगाव भिमा येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पिढीपुढे आदर्श ठेवला आहे.या यशाबद्दल तिचे व कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे
या यशाबद्दल कु.आरती घावटे यांचा सत्कार कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे, संचालक अशोक गव्हाणे, संचालक राजाराम ढेरंगे , माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे , वंदना गव्हाणे , रेखा ढेरंगे , जयश्री गव्हाणे,माजी ग्रामपंचायत सदस्या अंजली ढेरंगे , सामाजिक कार्यकर्ते तिरसिंग नानगुडे , किरण नानगुडे , दिपक गव्हाणे , तानाजी ढेरंगे ,प्रदीप खलसे, ओंकार घावटे यांनी केला.
चार वेळा एमपीएससी परीक्षेत अपयश – अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी असते असे म्हणत आतापर्यंत ४ वेळा एमपीएससी परीक्षेमध्ये काही गुणांनी अपयश आले, परंतु आतापर्यंत घेतलेल्या मेहनत व स्वतः वरचा विश्वास तसेच कुटुंबीयांचा आधार, यामुळे अपयशावर मात करून यश मिळवले.
यशाच्या शिखराला हुलकावणी देणारे प्रसंग चार वेळा येऊन गेले त्यावेळी दुःख झाले,त्रास झाला पण आईवडीलांचे कष्ट पाहून यश मिळवण्याची जिद्द मनाशी बाळगत तू थांबू नको थकू नको.. यश तुझेच आहे. शर्यत संपलेली कारण तू जिंकलेली नाहीस असे मनाशी ठरवत यशाचे शिखर सर केले.
या यशाबद्दल कु.आरती घावटे यांचा सत्कार कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे, संचालक अशोक गव्हाणे, संचालक राजाराम ढेरंगे , माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, ग्राम पंचायत सदस्य शरद ढेरंगे , वंदना गव्हाणे , रेखा ढेरंगे , जयश्री गव्हाणे,माजी ग्राम पंचायत सदस्याअंजली ढेरंगे , सामाजिक कार्यकर्ते तिरसिंग नानगुडे , किरण नानगुडे , दिपक गव्हाणे ,भाजपचे तानाजी ढेरंगे ,प्रदीप खलसे, ओंकार घावटे यांनी केला.
अधिकाऱ्यांनी घडवला भावी अधिकारी – सामाजिक उत्तरदायित्व जपत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पुणे उपजिल्हाधिकारी संजीवनी गोकुळे यांच्या मार्गदर्शनाने व पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे यांच्या प्रेरणेने एमपीएससी तयारी ते अधिकारी असा नेत्रदीपक प्रवास केला असल्याचे कु. आरती घावटे यांनी सांगितले.
आम्ही घडलो तुम्ही बी घडाना – कोरेगाव भिमा पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून उज्वल करियर घडवावे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी मागील चार वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत. यामुळे गावात स्पर्धा परीक्षांचे सकारात्मक निर्माण होत असून अधिकारी घडत आहेत.