भरतवाडी (ता. हवेली) येथील शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न मागील दहा वर्षांपासून प्रलंबित होता याबाबत नागरिकांनी पैलवान किरण साकोरे यांच्याशी संवाद साधला असता काही तासांमध्येच कामाला सुरुवात करण्यात आली व शेतकऱ्यांनी किरण साकोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला त्याचबरोबर आगामी काळात तुमच्या सोबत असल्याचा शब्द दिला यावेळी शेतकऱ्यांनी दहा वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे केले काम म्हणूनच आम्ही पैलवान किरण साकोरे यांच्या पाठीशी ठाम असा शब्द देत किरण साकोरे यांच्या कामाला माणुसकीला लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात नागरिकांचा भरघोस आशीर्वाद रुपी पाठिंबा मिळत आहे.
सरपंच नानी भोरडे ,काळू मारुती भोरडे, प्रभाकर निकाळजे, साहेबराव निकाळजे, किरण निकाळजे, राजू मांडे, शंकर मांडे, खंडेराव मांडे, सुभाष मांडे, ज्ञानोबा भोरडे, अंजना भोरडे, गणेश भोरडे, सुजित मांडे, अजिंक्य मांडे, योगेश मांडे, संजय मांडे, अजय मांडे, अलका मांडे, कमल मांडे, सतिश भोरडे, संपत भोरडे, संपत उकिरडे, शहाजी उकिरडे, दिनकर चोरामले, सतिश गायकवाड, अर्जुन गायकवाड, रामदास मांडे, बाळासाहेब गायकवाड, गंगाराम चोरामले, मोहन चोरामले, किसन चोरामले, बाळासाहेब कासुरे, दशरथ कासुरे, कैलास कासुरे, ईश्वर काळे, विठ्ठल कांची, लालाराम कांची, संजय सुभाष मांडे , अशोक भोरडे, संतोष कंचे नागरिकांनी रस्त्याच्या कामाबाबत आनंद व समाधान व्यक्त केले.
शेती, दैनंदिन जीवन आणि गावाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला भरतवाडी येथील रस्ता तब्बल दहा वर्षांपासून प्रलंबित होता. हा रखडलेला प्रश्न पैलवान किरण साकोरे यांनी तातडीने मार्गी लावताच ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून, “आम्ही पै. किरण साकोरे यांच्या पाठीशी ठाम आहोत” असा ठाम विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लाल मातीतील पैलवान, काळ्या आईच्या लेकरांसाठी सदैव तत्पर, शब्दाला जागणारा आणि हाकेला धावणारा नेता अशी ओळख निर्माण केलेल्या किरण साकोरे यांनी विकासकामांवर असलेला आपला ठाम भर पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर थेट विकासगंगा पोहोचवणारा हा नेता आश्वासनांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष काम करून दाखवतो, ही भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

प्रदिप विद्याधर कंद यांनी केलेली निवड योग्य : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटासाठी पैलवान किरण साकोरे यांची उमेदवारी निश्चित केली हा निर्णय योग्य ठरत असल्याचे त्यांच्या कामातून दिसून येत आहे. देवदर्शन यात्रांमधून हजारो भाविकांशी थेट संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी तत्काळ पुढाकार घेणारे पै. किरण साकोरे यांचा विकासाचा वेग सर्वसामान्यांच्या लक्षात येत आहे.
संवाद, विश्वास आणि तातडीची कामे : पै. किरण साकोरे यांच्या गावभेटी, संवाद दौरे आणि थेट संपर्कामुळे शेतकरी, कामगार, महिला भगिनी आणि ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. केवळ चर्चा व आश्वासनांपुरती राजकारणाची चौकट न ठेवता, समस्या मांडली की तातडीने ती सोडविण्याची कार्यपद्धती त्यांनी अवलंबली आहे. त्यामुळे गावोगावी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ग्रामस्थ हक्काने त्यांच्याकडे विकासकामांसाठी अपेक्षा व्यक्त करत आहेत.
‘आपला माणूस’ म्हणून मिळतेय ओळख : सर्वसामान्य जनतेच्या मनात ‘हा आपला माणूस आहे’ अशी प्रतिमा पै. किरण साकोरे यांनी निर्माण केली आहे. शब्दाला ठाम राहणारा, कामाला तत्पर आणि विकासाला प्राधान्य देणारा नेता म्हणून त्यांची ओळख अधिक बळकट होत चालली आहे. दहा वर्षांपासून रखडलेला रस्ता पूर्ण करून त्यांनी दिलेला शब्द पाळला असून, त्यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.
विकासाचाच अजेंडा : सेवा, समर्पण आणि विकास हाच आपला अजेंडा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करत पै. किरण साकोरे यांनी शेतकरी, ग्रामस्थ आणि महिला भगिनींच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भरतवाडीसह परिसरात “विकासाची गती वाढली आहे” अशी भावना व्यक्त होत असून, आगामी काळातही विकासकामांचा आलेख उंचावेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
