प्रदिप दादांची अचूक निवड! पै. किरण साकोरे यांच्याकडून बुर्केगाव-वाडे बोल्हाई शिवरस्त्याचे मुरुमीकरण

Swarajyatimesnews

आश्वासनांचा पाऊस नव्हे, कामाचा धडाका; शब्दाला जागणारा, हाकेला धावणारा आपला हक्काचा माणूस म्हणून किरण साकोरेंना जनतेचा पाठिंबा

बुर्केगाव (ता.हवेली): पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटासाठी पैलवान किरण साकोरे यांची निवड करून आपल्या दूरदृष्टीची व अचूकतेची प्रचिती दिली आहे. प्रदीप कंद यांचा विश्वास सार्थ ठरवत, पै. किरण साकोरे यांनी आपल्या सेवा, समर्पण आणि विकास कामांचा धडाका सुरू केला असून, बुर्केगाव ते वाडे बोल्हाई शिवरस्त्याचे तातडीने मुरमीकरण करून त्यांनी जनसेवेचे उत्कृष्ट उदाहरण समोर ठेवले आहे.

देवदर्शन यात्रेतून साधला थेट संवाद: किरण साकोरे यांनी नुकतीच देवदर्शन यात्रा आयोजित केली होती. या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक देवदर्शन कार्य करत पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य मायबाप जनतेशी थेट संवाद साधला.या जिव्हाळ्याच्या आणि कौटुंबिक संबंधातून साकोरे यांनी लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या.लोकांशी संवाद साधत अनेक अडचणी सोडावी यासाठी प्रयत्न करत आहे.

 बुर्केगाव ते वाडे बोल्हाई शिव रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकरी, कामगार आणि जनता विद्यालय, पिंपरी सांडसचे विद्यार्थी त्रस्त झाले होते. हा रस्ता (आंतर रस्ता) खड्ड्यांमुळे वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला होता आणि गावातील ८०% शेतकऱ्यांचा तो दररोजच्या रहदारीचा मार्ग होता.

विद्यार्थी हवालदिल: जनता विद्यालय, पिंपरी संडास येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या शाळकरी मुलांना, विशेषतः दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना, प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.याबाबत पै. किरण साकोरे यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधत आपल्या अडचणी मांडल्या यावर किरण साकोरे यांनी तातडीने रस्त्याच्या मुरुमी कारणाचे काम सुरू करत तातडीने पूर्ण केल्याने शेतकरी,विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी त्यांना भरभरून आशीर्वाद देत प्रदिप विद्याधर कंद यांच्या सेवाभावी नेतृत्व निवडीबद्दल विश्वास व्यक्त केला.

 कामाचा धडाका आणि कृतीशील नेतृत्व: समस्या ऐकल्यानंतर किरण साकोरे यांनी वेळ न घालवता तात्काळ कृती केली. त्यांनी स्वतः पुढाकार घेत या धोकादायक रस्त्यावर २ किलोमीटर लांबीचे मुरमीकरण केले. मुरमीकरणानंतर रोलर फिरवून हा रस्ता सर्वांसाठी सुरक्षित आणि सुखकर बनवण्यात आला.

किरण साकोरे यांनी केवळ आश्वासनांचा पाऊस न पाडता, समस्या प्रत्यक्ष कृतीने सोडवून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर आणि सर्वसामान्यांच्या घरोघरी संपर्क साधत, त्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्याची त्यांची धडपड कृतीयुक्त नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे.

किरण साकोरेंच्या नेतृत्वाला लोकांचा व्यापक आशीर्वाद:या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा रोजचा त्रास आता संपला या सेवा समर्पणाच्या भूमिकेमुळे पेरणी-लोणीकंद जिल्हा परिषद गटामध्ये किरण साकोरे यांच्यावरील लोकांचा विश्वास वाढला आहे. जनतेला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या या युवा नेतृत्वाला जनतेचा मिळत असलेला आशीर्वादात्मक पाठिंबा त्यांच्या समाजकार्यातील बळ निश्चितच वाढवत आहे. प्रदीप विद्याधर कंद यांची निवड काम करणारे आणि लोकांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देणारे नेतृत्व म्हणून सार्थ ठरली आहे, हे या कामातून सिद्ध झाले आहे.आहे.

यावेळी माजी चेअरमन भाऊसाहेब भोरडे, विठल जांभळकर,  मनोज जांभळकर, दिनकर जांभळकर,माजी चेअरमण कृष्णा जांभळकर,  दादासाहेब वागमोडे, बाळासाहेब थोरात,  गुलाब शिंदे ,विजय शिंदे, धनंजय शिंदे, बाबासो तनपुरे,भाऊ डोमाळे, विठ्ठल डोमाळे, आशेक ठोंबरे लहु थोरात  मा उप सरपंच सुनील ठोंबरे नाना कोळेकर, किसन कोळेकर, आनंदा थोरात, सतीश ठोबरे, अशोक ठोंबरे, सदाशिव ठोंबरे, अण्णा दाभाडे, नारायण जांभळकर, सर्जेराव थोरात,मनोज यनभर यांनी किरण साकोरे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!