कोरेगाव भीमात ‘ग’ फॅक्टरचा धमाका; ‘राजकीय जादुगारा’चा डाव उलटवला, गव्हाणे भावकीची वज्रमूठ!
अटीतटीच्या लढतीत अनिकेत गव्हाणे विजयी; ‘भरत’ बाणाने भेदले सत्तेचे लक्ष्य, ‘बबड्या’ ठरला गावचा कारभारी कोरेगाव भीमा (ता. शिरूर): शिरूर तालुक्याचे राजकीय प्रवेशद्वार असलेल्या ऐतिहासिक कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीने तालुक्याच्या राजकारणाची सर्व गणितेच बदलून टाकली आहेत. राजकारणातील ‘जादुगार’ समजल्या जाणाऱ्या किंगमेकरचे सर्व डावपेच धुळीस मिळवत, अनिकेत साहेबराव गव्हाणे यांनी ९ विरुद्ध ६ मतांनी सरपंचपदाची माळ…
