सावधान ! अनोळखी नंबरवरून आलेली APK लग्नपत्रिका डाऊनलोड कराल तर तुमचे बँक खाते होईल रिकामे 

Swarajyatimesnews

पुणे – व्हॉट्सॲपवर कोणत्या अनोळख्या मोबाइल नंबरवरून जर कोणती लग्नपत्रिका आली तर ती डाऊनलोड करू नका, अन्यथा मोबाइल हॅक झालाच म्हणून समजा.सध्या लग्नाचा हंगाम आहे. अनेक जण WhatsApp आणि ईमेलवर लग्नपत्रिका पाठवतात. त्यातील काही जण आपल्याला ओळखीचेही नसतात. त्यांचा मोबाईल नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह केलेला नसतो. तरीही कोणीतरी ओळखीचा किंवा मित्र असेल असे वाटून आपण विश्वास ठेवतो. त्यातही लग्नपत्रिका असल्याचे दिसल्यावर कोणीतरी लग्नाला बोलावले आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. लग्नाला जायला जमले नाही तरी कोणीतरी आपली आठवण काढली आहे असे वाटून कोणीही ती उघडतोच.

याचाच फायदा घेत स्कॅमर लोक बँक खाती लुटण्याचा डाव आखतात. हीच आहे नकली लग्नपत्रिका घोटाळा. ही फसवणूक आपल्या ईमेल किंवा WhatsApp वर लग्नपत्रिका पाठवून सुरू होते. पहिल्यांदा ती लग्नपत्रिकाच आहे असे वाटते. ही कोणाची असेल असे म्हणून आपण ती उघडण्याचा प्रयत्न करतो. सहसा लग्नपत्रिका PDF किंवा JPG स्वरूपात येतात. ही देखील PDF सारखीच दिसते.

जर ती उघडताना ती APK फाईल असल्याचे कळले तर लगेचच ती डिलीट करा. जर ती PDF फाईल असली तरीही, त्यात जर काही लिंक दिसली तर तीही लगेच डिलीट करा. आजकाल लग्नपत्रिकांमध्ये गुगल मॅप लिंक किंवा स्कॅन कोड असणे सामान्य आहे. त्याचप्रमाणे यातही लिंक असते. पण ती APK फाईल असते. जर तुम्ही ती क्लिक केली तर ही लिंक उघडून तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होते. एकदा लिंक मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाली की तुमचा मोबाईल हॅक झाल्यासारखेच आहे! त्यानंतर तुमच्या मोबाईलमधील सर्व माहिती चोरून, बँक खाते रिकामे केले जाते. काही ठिकाणी चोरटे आधीच हा नवा खेळ सुरू केला आहे.

लग्नपत्रिकेची पीडीएफ तुमचा मोबाइल करेल हॅक –  प्राथमिक माहितीनुसार हॅकर्स या स्कॅमसाठी सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिकेची पीडीएफ पाठवतात, जी पाहताना पूर्णपणे खरोखर लग्नपत्रिका आहे अशीच दिसते. पण, तुम्ही लग्नपत्रिकेची apk फाईल डाउनलोड करताच त्यानंतर मालवेअर तुमच्या मोबाइलमध्ये प्रवेश करतो. अशाने सायबर गुन्हेगार पूर्णपणे तुमच्या मोबाइलमध्ये प्रवेश करतात आणि तुमचा मोबाइल डिव्हाइस हॅक करतात.

यानंतर ते कोणत्याही गुन्हेगारी कृत्यासाठी तुमचा मोबाइल वापरू शकतात. तुमच्या मोबाइलचा संपूर्ण कंट्रोल हॅकरच्या हातात असतो. अशा परिस्थितीत ते तुमच्या मोबाइलवरून कोणालाही मेसेज पाठवू शकतात. मोबाइलमध्ये मालवेअर अॅक्टिव्ह असल्यामुळे ते तुमच्या मोबाइलमधील डेटाही चोरू शकतात. त्यांना तुमच्या मोबाइलवरील सर्व ॲप्स आणि फोल्डर्समध्ये प्रवेश करता येतो. हे हॅकर्स तुमच्या माहितीशिवाय तुमचे बँक अकाउंटदेखील रिकामे करू शकतात. 

तुमची सावधगिरी तुमचा मोबाइल हॅकर्सपासून तुम्हाला वाचवेल –  हा स्कॅम एका अनोळखी मोबाइल नंबरवरून पाठवलेल्या व्हॉट्सअ‍ॅपप मेसेजने सुरू होतो, ज्यात लग्नपत्रिकेची पीडीएफ असते. अनोळख्या व्यक्तीने पाठवलेल्या कोणत्याही मेसेजमधील फाईल जरा विचारपूर्वक डाउनलोड करा. जर तुम्ही चुकून ती एपीके फाईल डाऊनलोड केली असेल आणि तुम्हाला मोबाइलमध्ये काही संशयास्पद वाटले तर लगेच पोलिसांत तक्रार करा. ऐन लग्नसराईत उघडकीस आलेल्या या स्कॅमनंतर लोकांनी थोडी खबरदारी बाळगा.

अनेकदा लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी लोक आपल्या अनेक नातेवाईकांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करतात. अनेकदा आपल्याकडे काहींचे नंबर सेव्ह नसतात, अशावेळी त्या नंबरवरून आलेली लग्नपत्रिका डाऊनलोड करू नका, करायची असल्यास ती खरोखरच नातेवाईकांनी पाठवली आहे का याची खातरजमा करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!