शिवसेना(उद्धव ठाकरे) हवेली तालुका प्रमुख पदी निवडीबद्दल मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
वाघोली – शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,खासदार संजय राऊत यांच्या आदेशानुसार तर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर,जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) हवेली तालुका प्रमुख पदी युवराज सुदाम दळवी यांची निवड झाल्याबद्दल युवराज दळवी यांचा सत्कार महाविकास आघाडीच्या वतीने आमदार अशोक पवार,शिवसेना माजी पुणे जिल्हा उपप्रमुख तथा वाघोलीचे माजी उपसरपंच संजय सातव पाटील यांच्या हस्ते वाघोली येथे सत्कार पार पडला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक राजेंद्र पायगुडे,युवा सेनेचे राज्य सचिव विशाल सातव पाटील,वाघोली शहर प्रमुख दत्तात्रय बेंडावले,मराठा महासंघाचे सरचिटणीस गुलाब गायकवाड,वाहतूक सेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र तांबे,मनोज जाधवराव,रामदास गोरे,युवा सेना वाघोली शहर प्रमुख रोहन दळवी,ओमकार पायगुडे,ओमराज गोरे,विभाग प्रमुख शैलेश जाधव,आदी उपस्थित होते.
शिवसेना(उद्धव ठाकरे) चे धाराशिव संपर्क प्रमुख स्वप्नील कुंजीर,शिरूर तालुका प्रमुख पोपट शेलार,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदिप गोते,शिवसेना महिला आघाडीच्या समन्वयक अलका सोनवणे (हरगुडे),शिवाजी सातव पाटील,रोहिदास कटके,देवराम तांबे,प्रवीण कांबळे,मंगेश सातव,सुमित सातव,विलास कुसाळकर,सुहास शिंदे,सचिन पवार,राहुल पवार यांनी नवनियुक्त तालुका प्रमुख युवराज दळवी यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
[माझी राजकीय सुरुवात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पासूनच झाली असल्याने मी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आजपर्यंत पक्षनिष्ठ व पक्ष वाढीसाठी काम करीत आलो आहे.वाहतूक सेनेचा पुणे जिल्हाध्यक्ष पदावर मागील अनेक वर्ष उत्तम काम केल्याची दखल घेत मला पक्षाने शिवसेना हवेली तालुका प्रमुख पदी काम करण्याची संधी दिल्याने मी पक्षाचा मनापासून आभारी आहे. – युवराज दळवी,नवनिर्वाचित हवेली तालुका प्रमुख-शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे).
छायाचित्र ओळ:-शिवसेना(उद्धव बा.ठाकरे) हवेली तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल युवराज दळवी यांचा सत्कार करताना आमदार अशोक पवार,संजय सातव पाटील,मान्यवर.