प्रदिप विद्याधर कंद यांची किरण साकोरे अचूक निवड, लाल मातीच्या पैलवानाला काळया आईच्या लेकरांच्या (शेतकऱ्यांच्या) सेवेची आवड
लोणीकंद (ता. हवेली):राजकारणाच्या रणांगणात सत्तेच्या खुर्चीपेक्षा जनतेच्या हृदयात जागा मिळवणारे नेतृत्व हेच खरे लोकनेते असतात. प्रदीप विद्याधर कंदांच्या मार्गदर्शनाखाली आकाराला आलेले पै. किरण साकोरे हे असेच एक नेतृत्व आहे. लाल मातीतील कुस्तीचा कस आणि काळया आईच्या लेकरांच्या (शेतकऱ्यांच्या) सेवेची ओढ यामुळे किरण साकोरे यांनी जनसेवेचा एक नवा किरण साकोरे पॅटर्न’ उभा केला आहे. “लोकांच्या पायावर नतमस्तक होणारे कर्तृत्वान नेतृत्व” अशी त्यांची ख्याती आता घराघरांत पोहोचली आहे.

भक्ती आणि विकासाचा त्रिवेणी संगम : पै. किरण साकोरे यांचे कार्य केवळ फाईलींपुरते मर्यादित नाही. बैलगाडा घाटांचे सुसूत्रीकरण, भजनी मंडळांना भक्कम साथ, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती आणि मुरुमीकरण यांसारख्या पायाभूत सुविधांना त्यांनी प्राधान्य दिले. मात्र, त्यांची खरी ताकद ‘भक्ती’मध्ये आहे. काशी विश्वेश्वर, अयोध्येतील प्रभू श्रीराम, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची जगदंबा, आदमापूरचे संत बाळूमामा आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनयात्रांचे आयोजन करून त्यांनी हजारो भाविकांना वारी घडवून आणली. या माध्यमातून त्यांनी केवळ दर्शन घडवले नाही, तर प्रवासात सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा धडाका लावला.


समतेचा विचार आणि सामाजिक बांधीलकी : किरण साकोरे म्हणजे लाल मातीचा पैलवान सामाजिक समतेच्या रिंगणातही तितक्याच ताकदीने उतरला आहे. नागपूरच्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी त्यांनी अभिवादन यात्रा त्यांच्या सर्वसमावेशक विचारांची साक्ष देतात. समता, बंधुभाव आणि सर्वधर्मीय समभाव ही मूल्ये साकोरे यांनी केवळ भाषणातून नव्हे, तर आपल्या कृतीतून सिद्ध केली आहेत.

- किरण साकोरे: नेतृत्वाचा ‘पंचप्राण’
- श्रद्धा: अयोध्या, काशी ते महाराष्ट्रातील शक्तीपीठांप्रती निस्सीम निष्ठा.
- समता: चैत्यभूमीवरील सेवेतून जपलेला सामाजिक समतेचा धागा.
- नम्रता: यशाच्या शिखरावर असतानाही सर्वसामान्यांच्या पाया पडणारे ‘डाऊन टू अर्थ’ व्यक्तिमत्व.
- विकास: प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत पोहोचलेला कामाचा झंझावात.
- संयम: कठीण प्रसंगातही शांत आणि हसतमुख राहून मार्ग काढण्याची कला.
मायबाप जनतेच्या काळजात अढळ स्थान : खऱ्या अर्थाने, सत्तेचा वापर सामान्य माणसाचे अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी कसा करावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पै. किरण साकोरे! लाल मातीतील कुस्तीच्या संस्कारांमुळे त्यांच्यात आलेला संयम आणि जिद्द आज हवेली तालुक्याच्या विकासात दिसून येत आहे. म्हणूनच, ‘मायबाप’ जनता आज या कर्तृत्वान नेतृत्वाच्या पाठीशी हिमालयासारखी खंबीरपणे उभी राहत आहे.

