सणसवाडी ग्रामस्थांकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
सणसवाडी (ता. शिरूर) पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मांडवण-वडगाव रासाई गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी आणि माजी सभापती सुजाता पवार यांचा सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर आणि सणसवाडीतील निष्ठावान कार्यकर्त्यांनी यावेळी पवारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, मार्केट कमिटी संचालक दत्तात्रय हरगुडे, सावता परिषद जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, माजी चेअरमन सुहास दरेकर, उद्योजक निलेश दरेकर, प्रशांत दरेकर, दत्तात्रय शेळके, प्रवीण वाखारे, अनिल गोटे व ग्रामस्थ उपस्थित होते.
हे नाते जिव्हाळ्याचे : सणसवाडी आणि पवार कुटुंबाचे नाते हे केवळ राजकीय नसून ते अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. माजी आमदार अशोक पवार आणि सुजाता पवार यांनी सणसवाडी परिसराशी नेहमीच कौटुंबिक संबंध जपले आहेत. “सत्ता असो वा नसो, सणसवाडीकरांनी नेहमीच पवार कुटुंबावर मनापासून प्रेम केले आहे,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. सुजाता पवार यांच्या विजयाने हा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

यावेळी पंडित दरेकर यांच्यासह सणसवाडीतील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी सुजाता पवार यांच्या विजयाचा जल्लोष केला. सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वाला मांडवण-वडगाव रासाई गटातील मतदारांनी दिलेली ही कौल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
