माणुसकीचा सेवा कर्तव्य’ पथ: शिक्रापूरमध्ये ७५०० भीम अनुयायांना अल्पोपहार व सेवा

Swarajyatimesnews

कर्तव्य फाउंडेशनचा उपक्रम; २०८ व्या शौर्यदिनानिमित्त सामाजिक दातृत्वाचे दर्शन

शिक्रापूर (ता.शिरूर): कोरेगाव भीमा जवळील विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भीम अनुयायांच्या सेवेसाठी शिक्रापूर येथे कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने माणुसकीचा हात पुढे करण्यात आला आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी फाउंडेशनच्या वतीने सुमारे साडेसात हजार अनुयायांना व्हेज पुलाव, चहा आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सामाजिक ऋणाची जाणीव ठेवून राबवण्यात आलेला हा उपक्रम जनमानसात कौतुकाचा विषय ठरला आहे.

२०८ व्या शौर्यदिनानिमित्त विजय स्तंभाकडे जाणाऱ्या भीम अनुयायांचे शिक्रापूर येथे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सामाजिक ऋणाची जाणीव ठेवून फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा रमेश गडदे आणि शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमावेळी शिरूर पंचायत समिती गटविकास अधिकारी महेश डोके, सहाय्यक गट विकास अधिकारी लहामटे, विस्ताराधिकारी एस. के. शिंदे, बी. आर. गावडे, ग्रामपंचायत अधिकारी एस. व्ही. शिंदे, डी. एन. पलांडे, जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना श्रीकांत वाव्हळ, नंदकुमार वैद्य, संचालक गंगाधर देशमुख, शांताराम पाडळे, निलेश लोंढे, सुरेश साळवे, राणी कांबळे, रंजना वाघमारे, लता चितळकर, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश भुजबळ, राहुल राजगुरू इत्यादी सर्व कर्मचारी उपस्थित होते.

यासोबतच सामाजिक कार्यकर्ते महेश शिर्के, अंकुश घारे, ज्येष्ठ पत्रकार राजाराम गायकवाड, आदर्श ग्रंथपाल संतोष काळे, मोहम्मद  तांबोळी, पत्रकार निलेश जगताप, जितेंद्र काळोखे, मेघा तांबे, वैशाली गायकवाड, वंदना रामगुडे इत्यादी कर्तव्य फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सातत्याने कार्य करत असतो, त्याचाच एक भाग म्हणून लाखो भीम अनुयायांची सेवा करण्याची आणि समाजसेवेच्या कार्याची सुरुवात वर्षाच्या पहिल्या दिवसापासून होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि आनंद आहे.- अध्यक्षा मनीषा गडदे 

“माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म आहे. समाज बांधवांची सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बांधवांची सेवा करण्याची संधी नववर्षाच्या सुरुवातीला मिळणे हे मी भाग्याचे समजतो.”- आदर्श सरपंच रमेश गडदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!