अंधाराचे साम्राज्य दूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण; पै.किरण साकोरे यांच्या विकासकामाचे सर्वस्तरातून कौतुक
लोणीकंद (ता. हवेली) हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथील सोनवणे वस्ती गावठाण परिसरात गेल्या तब्बल बारा वर्षांपासून प्रलंबित असलेला वीज पुरवठ्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. युवा नेते पै. किरण साकोरे यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला असून, यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

१२ वर्षानंतर उजळला परिसर : सोनवणे वस्ती परिसरात गेल्या दशकाहून अधिक काळापासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असायचे. यामुळे स्थानिक नागरिकांना, विशेषतः महिला, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार मागणी करूनही प्रशासकीय स्तरावर हा प्रश्न रेंगाळला होता. ही बाब लक्षात येताच पै. किरण साकोरे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या समस्येचे गांभीर्य मांडले. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता हा संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला आहे.
कृतज्ञता आणि सत्कार : या विकासकामाबद्दल सोनवणे वस्तीतील ग्रामस्थांनी पै. किरण साकोरे यांचा विशेष सन्मान करून आभार मानले. “जे इतक्या वर्षांत शक्य झाले नाही, ते किरण साकोरेंनी करून दाखवले. केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष कृतीतून विकास कसा करावा, याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी माजी सरपंच सिताराम सखाराम सोनवणे, माजी उपसरपंच संतोष सोनबा सोनवणे, माजी सदस्य विठ्ठल जनार्दन सोनवणे, माजी चेअरमन राजेंद्र पांडुरंग कुंभार, रामभाऊ अशोक सोनवणे, सागर सुरेश सोनवणे, मुरली राजाराम सोनवणे, सुवर्णा रघुनाथ सोनवणे यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते, त्यांनीही या यशस्वी कामाचे स्वागत केले.
माजी चेअरमन राजेंद्र पांडुरंग कुंभार यांनीही प्रश्न सोडवण्यासाठी विशेष सहकार्य केले. वीज सुविधा उपलब्ध झाल्यामुळे सोनवणे वस्तीच्या शेतीच्या कामात मदत झाली तसेच सुरक्षिततेत वाढ झाली असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि दैनंदिन कामांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
