शिरूर – १९८ शिरूर विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून,२०नोव्हेंबर रोजी ४५७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रशासनाने मतदारांना सुलभ मतदानाचा अनुभव देण्यासाठीवोटर हेल्प डेस्क, आरोग्य सुविधा, पाळणाघर, आणि विश्रांतीच्या व्यवस्था केल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी ही माहिती दिली.
प्रचार संपला, नियमांची अंमलबजावणी सुरू –१८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचारकालावधी संपल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रचारसाहित्य, फ्लेक्स, बॅनर लावल्यास कडक कारवाई केली जाणार आहे.
मतदान केंद्र व मतदारसंख्या – ४५७ मतदान केंद्रे
– शिरूर तालुका: २१३
– हवेली तालुका: २४४
– एकूण मतदारसंख्या:४,६६,०४२
– पुरुष मतदार: २,४१,७८७
– महिला मतदार: २,२४,२३२
– इतर: २३
प्राथमिक सोयीसुविधा आणि विशेष व्यवस्था
– सेवा मतदार: ४०२
– दिव्यांग मतदार: ६३० (१९७ व्हीलचेअरची व्यवस्था)
– ८५ वर्षांवरील मतदार: ३१६२ (होम व्होटिंगसाठी वाहन उपलब्ध)
– मतदान केंद्रांवर वोटर हेल्प डेस्क तसेच माता आणि बालकांसाठी पाळणाघर उपलब्ध.
मतदानासाठी नियुक्त कर्मचारी आणि साधनसामग्री
– २०८ कर्मचाऱ्यांची नेमणूक:
– केंद्राध्यक्ष: ५०६
– मतदान अधिकारी: ११२७
– शिपाई: ४५७
– राखीव कर्मचारी: २०६
– मतदानासाठी १५९० ईव्हीएम मशीन, ज्यामध्ये ५४८ बॅलेट युनिट, ५४८ कंट्रोल युनिट, आणि ५९४ व्हीव्हीपॅटचा समावेश आहे.
– कर्मचार्यांच्या वाहतुकीसाठी ७२ एसटी बस, ९ मिनी बस आणि ९ जीप उपलब्ध.
मतदानाचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे
– मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रचारबंदी.
– मतदारांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांची नेमणूक, ज्यामध्ये 18 वर्षाखालील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी.
संपर्क आणि आपत्कालीन सेवा – मतदानाशी संबंधित तक्रारींसाठी कंट्रोल रूम क्रमांक 02138/299147 कार्यरत आहे.
मतदारांनी वेळेत मतदान करून लोकशाही मजबूत करण्यासाठी पुढे यावे,असे आवाहन निवडणूक अधिकारी संगीता राजापूरकर यांनी केले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान टक्केवारीत कंसात त्यावेळी असणारी एकूण मतदार संख्या..
२००९ : ६४.२८ टक्के (२८५१२९)
२०१४ : ६९.६४ टक्के (३१०४८९)
२०१९ : ६७.३१ टक्के (३८४३२३)
२०२४ ची एकूण मतदार संख्या (४६६०४२)
२०२४ च्या शिरुर हवेली विधानसभा निवडणुकीत वयोमानानुसार सरासरी मतदार टक्केवारीत….
१८ ते २५ : १४ टक्के
२६ ते ३५ : २६ टक्के
३६ ते ५० : ३२ टक्के
५१ ते ६० : १३ टक्के
६० वर्षावरील : १५ टक्के