प्रदिपदादा कंद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ‘सेवा हीच साधना’ या तत्त्वाने यात्रेचे भव्य आयोजन.
लोणीकंद (ता. हवेली) : १ नोव्हेंबर २०२५ ,भक्तीचा उत्सव, समर्पणाचा संकल्प! करत काशी-अयोध्या यात्रेनिमित्त हवेली तालुक्यातील पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेला अध्यात्मिक समाधान मिळावे आणि समाजात श्रद्धा, संस्कार व समाज एकतेचा तसेच भक्ती व समर्पणाचा संदेश जावा, या उदात्त हेतूने ‘प्रदिपदादा कंद युवा मंच’ आणि ‘पै. किरण साकोरे मित्र परिवार’ यांच्या वतीने मोफत काशी विश्वनाथ-अयोध्या देवदर्शन यात्रेचे भव्य आणि गौरवास्पद आयोजन करण्यात आले आहे.

या यात्रेतील मायबाप जनता, भाविक-भक्तांना आवश्यक माहिती देण्यासाठी व त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी भव्य संवाद मेळावा उद्या २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता,पुणे-नगर महामार्गावर,पेरणे फाटा टोलनाक्याजवळ असलेल्या गोल्डन पॅलेस येथे पार पडणार आहे.या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था तसेच गावागावांतून ने-आण करण्यासाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिनांक ५ नोव्हेंबर व १३ नोव्हेंबर रोजी हवी भाविक यात्रेचे आयोजन – मोफत काशी विश्वनाथ-अयोध्या देवदर्शन यात्रेचे भव्य आयोजन दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहिल्या स्पेशल रेल्वे द्वारे करण्यात आले आहे.तर या यात्रेचा दुसऱ्या टप्प्यात दुसरी रेल्वे १३ नोव्हेंबर रोजी आहे.
सदर यात्रेचे आयोजन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पी.डी.सी.सी.बँकेचे संचालक तर भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद,शिरूर-हवेलीचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष तथा भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पै.संदिप भोंडवे,यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप,हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके,पुणे,हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती तथा संचालक रविंद्र कंद,जिल्हा परिषदेचे मा.सदस्य शंकर भुमकर,हवेली पं.स.च्या मा.उपसभापती संजीवनी कापरे व थोर,मोठ्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली,तर झेड.पी.गटातील युवक,तरुण यांच्या सहकार्यातून या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील पै.किरण साकोरे मित्र परिवार यांच्या वतीने देण्यात आली.
सेवा हीच साधना –
आपल्या लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्या रामलल्ला दर्शनाचा आनंद मिळावा,हीच आमची प्रेरणा आहे.भक्तांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.ही यात्रा समाजाला एकात्मतेचा आणि धार्मिक अध्यात्मिक उन्नतीचा संदेश देणारी ठरेल.” साकोरे म्हणाले की,राजकारणाची व्याख्या केवळ सत्ता नसून,जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेला एक पवित्र संकल्प आहे.’सेवा हीच साधना’ हे तत्त्व जप्त आहे. – पै.किरण संपत साकोरे
आमदार माऊली कटके, प्रदीप कंद,संदिप भोंडवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विकासाचा संकल्प – प्रदिप कंद,माऊली कटके,संदिप भोंडवे यांच्या मुख्य प्रमुख मार्गदर्शनाखाली विकासाचा संकल्प समोर ठेऊन लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटात काम करीत असून गटाचा सर्वांगीण विकास करण्याच्या हतूनेच निवडणुकीच्या रिंगणात आम्ही सर्व बाजूंनी उतरलो असल्याचे पै.किरण साकोरे यांनी सांगितले.
लोकप्रिय युवा नेतृत्व म्हणून – पै.किरण साकोरे यांची ओळख सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेले पै.किरण साकोरे यांनी स्वकष्टाने व्यवसायात प्रगती केली असून,फुलगाव,लोणीकंद व पेरणे परिसरात उद्योजकतेला बळ देणारे आणि ग्रामीण अर्थकारणाला नवा वेग देणारे लोकप्रिय युवा नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात.विनम्रता,तरुणांच्या कल्पनांचा स्वीकार आणि ज्येष्ठांच्या सल्ल्याचा आदर यामुळे ते विकासाच्या दूरदृष्टीसह कार्य करणारे लोकप्रिय युवा नेते म्हणून प्रसिद्धीस आले आहेत.
आई-वडीलांच्या प्रेरणेतून झेड.पी.गटात रचनात्मक विकासाची मुहूर्तमेढ – पै.किरण साकोरे यांच्या प्रेरणेचा स्तंभ त्यांचे वडील संपत साकोरे व त्यांच्या मातोश्री फुलगावच्या मा.सरपंच मंदाकिनी संपतराव साकोरे ह्या आहेत,ज्यांनी फुलगावच्या विकासाला चालना देत मोलाचे योगदान दिले आहे.आता आई,वडिलांच्या प्रेरणेतून पेरणे-लोणीकंद गटामध्ये रचनात्मक विकासाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम सुरू केल्याचे पै.किरण साकोरे यांनी सांगितले.
अध्यात्म,समाजसेवा आणि विकास – या तिन्हींचा संगम साधत, पै.किरण साकोरे यांनी काशी-अयोध्या यात्रेच्या माध्यमातून समाजात भक्ती, एकता आणि विकास परिवर्तनाचा दिवा पेटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
