धक्कादायक! उरुळी कांचन येथे रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न
पुण्यातील उरुळी कांचन येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. उरूळी कांचनच्या हद्दीत २९ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास लोको पायलटच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.याप्रकणी उरूळी कांचन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे व…
