शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल कांबळे ‘महावितरण श्री’
अतितटीच्या लढतींमुळे राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेला मोठा प्रतिसाद बारामती – दि. ६ फेब्रुवारी वीजसेवेच्या धकाधकीचे दैनंदिन कामकाज सांभाळून शरीराला सुडौल व सुबद्ध आकार देत शरीरसंपदा कमावणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकत वाहवा मिळवली. यात कोल्हापूर परिमंडलाचे राहुल विजय कांबळे यांनी पहिला ‘महावितरण श्री’चा किताब पटकावला. दरम्यान, बारामती येथील विद्यानगरी प्रतिष्ठानच्या क्रीडा संकुलात…
