एक तर तू झोप, नाहीतर जावेला पाठव, संबधास नकार दिल्याने १९ वर्षीय नराधमाने महिलेवर केले कटरने वार, २८० टाके
महिलेवर सव्वादोन फुटांचा एक वार तर ऑपरेशन साठी २२ हजारांचा लागला दोरा छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना रविवारी घडली होती. भावकीतीलच ३६ वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या वर्षांच्या तरुणाने नकारानंतर तिच्या अंगावरती कटरने वार केले.यामुळे महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या अंगावर एक वार सव्वादोन फुटाचा असून शरीरावर ठीकठीकानी वार झालेले असून गोधडी शिवल्यागत डॉक्टरांनी…
