
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे चहाच्या दुकानात दारू विक्री प्रकरणी एकाला अटक
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील एका चहाच्या दुकानातून होणाऱ्या दारूविक्रीवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत दारूसाठा जप्त केला. याबाबत पोलीस शिपाई उमेश देविदास जायपत्रे (वय ३२, रा.शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पूणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी संतोष गुलाबराव गायकवाड (वय ४७, रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Pune Gramin…