
सातत्याने वाचन केल्याने आदर्श व बहुगुणी व्यक्तिमत्त्व विकास होण्यासह माणसाला माणूस बनवते -व्यवस्थापक सुरेश साळुंके
वाघोली ( ता.हवेली) वाचनाने माणूस ज्ञानी होतो, त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला असून वाचन माणसाला माणूस बनविते,त्यांच्यातला माणूस घडवते, विविध ज्ञानशाखांचा त्याला परिचय होतो, त्याच्या जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते. आपल्या समाजात ‘वाचाल तर वाचाल’…