सोलापूर जिल्ह्यात महावितरणने मंगळवारी (दि.१)३९६ वीजचोरांवर एकाच दिवशी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वीजचोरी करणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे, तर विजेचा गैरवापर करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या नेतृत्वात, एकाच दिवशी जिल्हाभरात ही कारवाई करण्यात आली. १७७९ वीजजोडणी तपासण्यात आल्या, त्यामधून ३९६ ठिकाणी वीजचोरीचे प्रकार उघड झाले. यामध्ये पंढरपूर विभागात१३४९०अकलूज 80, सोलापूर ग्रामीण 78, आणि सोलापूर शहर विभागात 14 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली.
सर्व दोषींवर भारतीय विद्युत अधिनियम 2003 अंतर्गत कलम 135 आणि 138 अनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच, विजेचा गैरवापर करणाऱ्या 21 ग्राहकांवर कलम 126 अंतर्गत दंड आकारला जाणार आहे. याशिवाय, शेतीपंपांसाठी वापरण्यात आलेल्या 167 अनधिकृत केबल्स आणि आकड्यांवरही कारवाई करत त्यांची तातडीने हटवणी करण्यात आली आहे.
महावितरणच्या या कठोर कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे, ज्यामुळे वीजचोरी आणि गैरवापरावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.