
Category: Uncategorized

संतापजनक! रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटाला जेलऐवजी लावलं ॲसिड; महिला गंभीर जखमी
जालना जिल्ह्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या पोटाला सोनोग्राफी करण्यापूर्वी जेलीऐवजी ॲसिड(किंवा तत्सम दाहक रसायन) लावण्यात आल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने, या घटनेनंतर अर्ध्या तासाने महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, बाळ सुखरूप आहे. नेमकी काय घडली घटना? खापरखेडा वाडी…

राज्यातील वीज ग्राहकांसाठी ‘अच्छे दिन’; पहिल्यांदाच पाच वर्षांत दर कमी होणार!
महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी एक ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणकडून सादर करण्यात आलेल्या याचिकेवर सकारात्मक निर्णय देत पुढील पाच वर्षांत वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज दर कमी होणार असून, यामुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या वर्षी वीज दरात १०…

आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजयव गांगुर्डे सेवेतून बडतर्फ; २७.५१ कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळात कोट्यावधी रुपयांच्या धान्य खरेदी गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, त्यांच्यावर २७.५१ कोटी रुपयांची वसुली लावण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी हे आदेश दिले आहेत, ज्यामुळे…

धक्कादायक! शिक्षकाची शाळेच्या वर्गातच गळफास घेत आत्महत्या
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका शिक्षकाने शाळेतच आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेत कार्यरत असलेले रवींद्र महाले यांनी शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान दुसऱ्या मजल्यावरील वर्गखोलीत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मधली सुट्टी संपल्यानंतर रवींद्र महाले यांना गळफास…

दोन वेगवेगळ्या चोरीप्रकरणातील सोन्याचे दागिने मूळ मालकांच्या स्वाधीन
शिरूर पोलिसांचे नागरिकांतून कौतुक! शिरूर (जि. पुणे): शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. चोरीस गेलेले सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पुन्हा मूळ मालकांना परत करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व त्यांच्या पथकाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. गुन्हा १: एसटी स्थानकाजवळून गळ्यातील…

काळाचा घाला! आई-वडिलांविना कष्टातून आयुष्य फुलवले, पण हृदयविकाराने प्रदीप ढेरंगेंना हिरावले
कोरेगाव भीमावर शोककळा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर कोरेगाव भिमा (ता. शिरूर): आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाला सामोरे जाऊन, मोठ्या हिमतीने स्वतःचा संसार आणि शेती फुलवलेल्या कोरेगाव भीमा येथील मनमिळावू, कष्टकरी आणि हसतमुख प्रगतशील शेतकरी प्रदीप ढेरंगे (वय अंदाजे ४०-४५ वर्षे) यांचे मध्यरात्री ३ वाजता आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या धक्कादायक बातमीने कोरेगाव भीमा आणि पंचक्रोशीवर…

‘तुम्ही कुठे कलेक्टर झालात?’ – मुलीच्या उत्तराने संतापलेल्या मुख्याध्यापक बापाने पोटच्या लेकीलाच संपवले; सांगलीत धक्कादायक घटना
सांगली, (आटपाडी): बारावीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला नीट (NEET) परीक्षेच्या चाचणीत कमी गुण मिळाल्याच्या रागातून एका मुख्याध्यापक बापाने जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातून समोर आली आहे. याप्रकरणी वडील धोंडीराम भोसले या मुख्याध्यापक पित्यास अटक करण्यात आली आहे. कमी गुणांमुळे संताप, मुलीचे ‘उलट…

पॅकोलाइन कंपनीकडून वारकऱ्यांना फराळाचे वाटप: माणुसकीच्या सेवेचा आदर्श!
हडपसर (ता. हवेली): अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल परमात्म्याच्या वारी सोहळ्यात हडपसर येथे एक माणुसकी आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत, पॅकोलाइन इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने फराळाचे वाटप केले. कंपनीचे मालक बाझील शेख आणि एचआर राजीव नायर यांच्या वतीने…

आता पैशांमुळे कोणाचेही शिक्षण थांबणार नाही: ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी’ योजनेद्वारे घरबसल्या मिळवा बिनव्याजी कर्ज!
योजनेमुळे घरबसल्या, कुठल्याही हमीदाराशिवाय आणि मालमत्ता गहाण न ठेवता शैक्षणिक कर्ज मिळवता येते बँकेच्या फेऱ्या नाहीत, थेट पोर्टलवर अर्ज! चांगले शिक्षण मिळावे आणि चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे हे स्वप्न अपूर्ण राहते. आता ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना’ (PM VidyaLakshmi Yojana) सुरू केली…

शेतकऱ्याची ‘कारभारीण’ – आधुनिक महाराष्ट्राची खरी हिरोईन!
शेतकऱ्याची कारभारीण: संस्कृती, समर्पण, स्वावलंबन आणि स्त्रीशक्तीचा गौरव! मातीत जन्मलेली, संस्कृतीने घडलेली, कुटुंबाला आधार देणारी, आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचा मार्ग घडवणारी – ही आहे शेतकऱ्याची ‘कारभारीण’. शहरी झगमगाटात हरवून न जाता, आपल्या ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडून, स्वतःच्या कष्टाने आणि बुद्धीने एक नवा आदर्श निर्माण करणारी ही शेतकऱ्याची पत्नी म्हणजे खऱ्या अर्थाने असामान्य स्त्रीशक्तीचे प्रतीक! ती…