Category: Latest Update
कोरेगाव भिमा येथे विसर्जन मिरवणुकीत अप्पाचा नाद नाय आणि पोलिसांचा मंडळांना धाक नाय
डीजेवर कार्यकर्ते बेभान, कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण, वाहनाच्या रांगा ट्रॅफिक जाम,अडकलेल्या रुग्णवाहिका , ढोलताशांचा पारंपरिक ठेका पण सामाजिक संदेश देणारे देखावे हरवले, पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना फटका, कायदा सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण तर तालावर नाचणारे कार्यकर्ते बेभान झाल्याचे दिसून आले.त्यात…
कोंढापुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहिम
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर) : कोंढापुरी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा हटवून रस्त्याची स्वच्छता केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना व पाहुण्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. कोंढापुरीचे ग्रामदैवत खंडोबा मंदिर आणि जवळच असलेला पाझर तलाव या परिसरातील…
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, सायबर क्राईम, व्यसनाधीनता आणि चुकीची संगत टाळावी – ॲड. प्रिया कोठारी
रांजणगाव गणपती (ता.शिरूर) मंगलमूर्ती विद्याधाम प्रशालेमध्ये नुकताच विद्यार्थी आणि पालकांसाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून प्रसिद्ध ॲड. प्रिया कोठारी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, सायबर क्राईम, व्यसनाधीनता आणि चुकीची संगत यांसारख्या आजच्या ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकत विद्यार्थी व पालकांना मोलाचा सल्ला दिला. ॲड. प्रिया कोठारी यांनी…
शिक्रापूर येथे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आधार फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना ट्रॉफी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी राजेंद्र टिळेकर , आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष खैरे, केंद्रप्रमुख अनिल पलांडे, केंद्रप्रमुख लंघे, शाळेच्या…
सरपंच संदीप ढेरंगे यांच्यामुळे कोरेगाव भीमाचे नाव दिल्लीत पोहोचल्याचा अभिमान – उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले
कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमाचे (ता. शिरूर) सरपंच संदीप ढेरंगे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहणासाठी विशेष निमंत्रण मिळाल्याने कोरेगाव भीमाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. सरपंच ढेरंगे यांच्या विकासकामांची दखल थेट दिल्लीत घेतली गेल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी काढले. या निमंत्रणाबद्दल बोलताना प्रशांत ढोले म्हणाले,…
निलंबित पोलिस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
अंबाजोगाई – सेवेतून निलंबित असलेले माजी पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (सोमवारी) रात्री ८ वाजता उघडकीस आली आहे. परळी तालुक्यातील नागदरा हे मूळ गाव असलेले सुनील नागरगोजे हे अनेक वर्षांपासून अंबाजोगाई येथे वास्तव्यास होते. परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत त्यांनी पोलिस सेवेत…
माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेत अन्नदान
सणसवाडी (ता.शिरूर) येथे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत व एक विधायक समाजोपयोगी उपक्रम राबवत माहेर संस्थेतील मनोरुग्ण ,वृद्ध,महिला व बालकांना अन्नदान करण्यात आले. माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी येथील माजी आमदार अशोक पवार यांचे जिवाभावाचे निष्ठावान समर्थक माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर व मित्र परिवाराने सामाजिक…
पुणे येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ३३१ पदकविजेत्यांचा गौरव
मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभ दि. २८ ऑगस्ट पुणे– राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून, पुणे येथे ३३१ पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा सोहळा पार पडेल. या कार्यक्रमात, ‘मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटर’ या महत्त्वाकांक्षी योजनेचाही शुभारंभ…
संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत हाच यशाचा मंत्र – शंकर भूमकर
श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे थाटात उद्घाटन; नवीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण लोणीकंद (ता. हवेली): “संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मेहनत – हाच यशाचा खरा मंत्र आहे,” असा मोलाचा संदेश देत श्री रामचंद्र अभियांत्रिकी (डिप्लोमा/पॉलिटेक्निक) महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या ‘इंडक्शन प्रोग्राम-२०२५’चे उद्घाटन थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे संस्थापक सचिव शंकर भूमकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न…
शिक्रापूरमध्ये ‘पर्यावरणपूरक मंदिर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर: श्रावणी सोमवारच्या पवित्र दिनी, शिक्रापूर गावात एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. विद्यादाम प्रशाला, शिक्रापूर येथील १९८७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामपंचायतीने एकत्र येत ‘पर्यावरणपूरक मंदिर’ ही मोहीम सुरू केली. या उपक्रमांतर्गत गावातील चार मंदिरांमध्ये पॉलिथीनमुक्त परिसरासाठी प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मंदिरांचे परिसर स्वच्छ आणि पॉलिथीनमुक्त…
