Category: Latest Update
चाकणला नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अत्याचार
मेदनकरवाडी (ता.खेड) चाकण पोलिस स्टेशन परिसरात एक खळबळजनक व संतापजनक घटना समोर आली आहे. चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (१३ मे) ला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे घडली असून आरोपीला पोलिसांनी आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित…
हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांच्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील हिंजवडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय नामदेव काळे यांच्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(A case has been registered against Dattatray Namdev Kale, Sub-Inspector of Hinjewadi Police Station under Chinchwad Police Commissionerate, for demanding a bribe.) तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात…
तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यात बहिष्कार; ‘Ban Turkey apple’ हा देशभक्तीचा ट्रेंड देशभरात गाजतोय!
पुणे – भारतावर दहशतवादील हल्ला करणाऱ्या नापाक पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या तुर्कीये देशाला भारतातील व्यापाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर मिळालं आहे. पुण्यातील बाजारपेठांतील व्यापाऱ्यांनी तुर्कीयेहून येणाऱ्या सफरचंदावर बहिष्कार टाकत ‘बॅन तुर्कीये ॲपल’ हा देशभक्तीचा अनोखा आणि प्रभावी ट्रेंड सुरू केला आहे. हा निर्णय केवळ आर्थिक नव्हे, तर राष्ट्रीय अस्मितेच्या रक्षणासाठी उचललेलं एक अभिमानास्पद पाऊल ठरत आहे.(Pune traders…
शिक्रापूरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर विजय रॅलीद्वारे भारतीय लष्कराला सलाम
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेनंतर ग्रामस्थांनी भव्य विजय रॅलीचे आयोजन करून लष्कराच्या पराक्रमाला सलाम केला. या रॅलीत शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून…
धक्कादायक ! शिक्रापुरात दुचाकी आणि पीएमपीएल बसच्या भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू
दोन मावस भाऊ मृत यामध्ये वीस वर्षांची दोन व सोळा वर्षांच्या एका मुलाचा मृतांमध्ये समावेश पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शिक्रापुर येथे शुक्रवारी (दि. ९ मे २०२५) रात्री साडे नऊच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात अॅक्सेस १२५ दुचाकी क्र. MH १२ XG ४७९६ आणि पीएमपीएल बस क्र. MH १२ XM ८८२१ यांची समोरासमोर धडक…
महाराष्ट्र दिनानिमित्त शिक्रापूर येथे स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांचा एम. पी. एस. सी परीक्षेत यशस्वी डंका शिक्रापूर (ता.शिरूर) दिनांक १मे – विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूर येथे आज एम पी एस सी परीक्षेत विविध पदांवर नियुक्त झालेल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत…
बी.जे.एस. महाविद्यालयास ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’
पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी केल्याने निवड पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने बी.जे.एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली यांना ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दि.२३ एप्रिल २०२५ रोजी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे ही सभा पार पडली. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय…
पुण्याच्या खेड तालुक्यातील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीच्या घराला व ट्रॅक्टरला आज्ञातांकडून पेटवून देण्याचा प्रयत्न..
मांजरेवाडी (धर्म, ता. खेड) मुलीच्या अपहरण अत्याचार आणि नंतर निघृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीचे घर व घरासमोरील ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिस व अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी फाशी देण्याची मागणी होत आहे.मांजरेवाडीतील संतापजनक घटनेनंतर शुक्रवार दि १८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास…
शिक्रापूर येथे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याची उत्साहात सुरुवात
शिक्रापूर (ता. शिरूर) : जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 या अभियानाचा शुभारंभ शिक्रापूर येथील शासकीय विश्रामगृहात 15 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात शिक्रापूर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आली. यावेळी सहाय्यक अभियंता अश्विन पवार, अजय वाघमोडे, राजेश…
महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सुप्रीम कोर्टाचे ५२ वे सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश पदी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.१४ मेला राष्ट्रपती द्रोपती मुर्मू या गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे जन्म झाला. १९८५ मध्ये त्यांनी वकिलीची सुरुवात केली. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत…
