
Category: स्थानिक वार्ता

संत निरंकारी मिशनतर्फे शिक्रापूर येथे रक्तदान शिबिर; १४५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
शिक्रापूर, (ता. शिरूर)सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या सामाजिक उपक्रमांतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारे शिक्रापूर येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १४५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेच्या सेवेचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.रक्तसंकलनाचे कार्य यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले. या शिबिराचे उद्घाटन…

राज्य गुणवत्ता यादीत शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदिपक यश
शिक्रापूर, (ता. शिरूर): पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिक्रापूर येथील १९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून, राज्य गुणवत्ता यादीत सुयश उगले याने थेट ९ वा क्रमांक पटकावत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या यशामुळे शाळेच्या शिष्यवृत्ती यशपरंपरेला अधिक बळ मिळाले आहे. शाळेचे एकूण २० विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या गुणवत्तेची…

धक्कादायक! कोरेगाव भिमा – पेरणे येथील भीमा नदीत आढळला पुरुषाचा मृतदेह
पुणे-अहमदनगर मार्गावर वाहतूक कोंडी पेरणे (ता. हवेली): कोरेगाव भिमा आणि पेरणे गावांच्या हद्दीतील भीमा नदीपात्रात आज एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह (वय अंदाजे ४०-४५ वर्षे) वाहून आलेला आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने पुणे – अहमदनगर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा…

आदर्श सरपंच रमेश गडदे यांचा ज्येष्ठ नागरिकांना ‘काठीचा आधार’
शिक्रापूरमध्ये सामाजिक बांधिलकीचे दर्शन शिक्रापूर (ता.शिरूर) भूमीतून सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय आज लिहिला गेला. शिक्रापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत, आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हृदयस्पर्शी पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी आधार मिळावा म्हणून काठी वाटप करण्यात आले. हा केवळ एक वस्तू वाटपाचा कार्यक्रम नव्हता, तर ज्येष्ठांच्या आयुष्यात ‘आधार’ बनून त्यांना सन्मानाने जगण्याचे बळ देणारा एक…

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कही खुशी, कही गम!
दिनांक ११ ११ जुलै २०२५: शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत मुख्य तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सोडतीमुळे अनेक गावांमध्ये खुले पद मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण होते, तर काही गावांमध्ये आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत उमटल्या. पारदर्शकतेने पार पडली सोडत…

सणसवाडीतील वसेवाडी शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम
२९ विद्यार्थी चमकले सणसवाडी (ता.शिरूर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी) ने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. इयत्ता…

शिरूरमध्ये किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; एकास अटक
शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कवठे यमाई येथे काल रात्री, ९ जुलै २०२५ रोजी, किरकोळ वादातून एका तरुणावर लोखंडी फायटरने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम गोरक्षनाथ कांदळकर (वय १८) या तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिवम काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास…

धक्कादायक! पुण्यात आई वडिलांनी अवघ्या ४० दिवसांच्या चिमुकलीला ३.५ लाखांना विकले
पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांसाठी एका आई-वडिलांनी आपल्या अवघ्या ४० दिवसांच्या मुलीची ३.५ लाख रुपयांना विक्री केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आई-वडिलांची नावे मीनल ओंकार सपकाळ (२९) आणि ओंकार औदुंबर सपकाळ (२९) अशी असून ते दोघेही बिबवेवाडीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Protected: शिक्रापूर येथे प्राचार्य सोनबापू गद्रे व विलास कांबळे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
There is no excerpt because this is a protected post.

५३ वर्षांनंतर कोरेगाव भिमा येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण: गावकऱ्यांच्या एकीने साधला ‘तिहेरी विकास’
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे महाराष्ट्रातील सर्वात भीषण ठरलेल्या १९७२ च्या दुष्काळात खोदलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी व खोलीकरणासाठी ५३ वर्षांनंतर एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे! “गावच्या सर्वांगीण विकासात एकी, गावच्याप्रति विकास कामात नेकी आणि आणखी बराच विकास बाकी” असा दृढ निश्चय करत कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी नरेश्वर मंदिरामागे असलेल्या जल तलावाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी…