Category: स्थानिक वार्ता
माजी आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच शशिकला सातपुते यांचा सत्कार
निष्ठा, एकी आणि नेकीची परंपरा जपणारे गाव म्हणजे सणसवाडी, ” कै. दत्ताभाऊंची निष्ठा आणि सणसवाडीची एकी विसरण्यासारखी नाही” माजी आमदार ॲड. अशोक पवार सणसवाडी (ता. शिरूर): सणसवाडी गावच्या ग्रामस्थांनी जपलेली निष्ठा, एकी आणि नेकीची गौरवशाली परंपरा पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. शशिकला रमेश सातपुते यांची बिनविरोध निवड होताच संपूर्ण गावात उत्साहाचे आणि…
सणसवाडी ग्रामनगरीच्या सरपंचपदी शशिकला रमेश सातपुते यांची बिनविरोध निवड
गावच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘नवरा–बायको’ सरपंच होण्याचा मान सातपुते कुटुंबाच्या नावावर कोरेगाव भीमा –उद्योगनगरी सणसवाडी (ता. शिरूर) येथे सरपंच रूपाली दगडू दरेकर यांनी नियोजित वेळेत राजीनामा दिल्यानंतर नव्या सरपंचपदासाठी झालेल्या प्रक्रियेत शशिकला रमेश सातपुते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. कोणतीही स्पर्धा नसल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया जी. डी. शेख मॅडम यांच्या…
मुलासारखी सेवा, मन जिंकणारी व्यवस्था, भाविकांकडून पै. किरण साकोरे यांच्या यात्रेची पुन्हा एकदा भरभरून प्रशंसा
बाळूमामा , आई जगदंबे तुमच्या भंडार कुंकवाने आमचा मळवट भरला तसा आमच्या किरणच्या कपाळाला विजयाचा गुलाल लागू दे या लेकराची आई स्वप्ने पूर्ण कर पेरणे फाटा (ता. हवेली): काशी-अयोध्या मोफत देवदर्शन यात्रेच्या अभूतपूर्व यशानंतर प्रदीपदादा कंद युवा मंच आणि पै. किरण साकोरे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील यात्रेलाही भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पै….
पत्रकार प्रा. डॉ. दत्तात्रय कारंडे यांचे निधन शिरूर तालुक्यात शोककळा
अल्पशा आजाराने वयाच्या ४५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर: न्हावरे (ता. शिरूर) येथील पत्रकार आणि मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. दत्तात्रय मारुती कारंडे यांचे आज पहाटे (दि. १ डिसेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. ते अवघे ४५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. कारंडे यांनी तळेगाव…
माझे रेकॉर्ड मोडत पुणे जिल्ह्यात ‘एक नंबर ’ मतांनी किरण साकोरे निश्चित विजयी होतील – प्रदीप विद्याधर कंद
पुणे जिल्ह्यात लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचा विकास किरण साकोरे करतील असा विश्वास प्रदिप विद्याधर कंद यांनी व्यक्त केला. पेरणे फाटा (ता. हवेली) – “पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा माझा रेकॉर्ड पै. किरण साकोरे निश्चित मोडतील. पुणे जिल्ह्यात ‘एक नंबर’ मतांनी विजयी होणारा उमेदवार म्हणजे किरण साकोरे,” असा विश्वास जिल्हा परिषदेचे…
शिक्रापूर येथे ॲनिमिया मुक्त गाव अभियान’ व आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन
शिक्रापूर, (ता.शिरूर), दिनांक: २८ नोव्हेंबर: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिरूर यांच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत आरोग्य उपकेंद्र शिक्रापूर आणि ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्रापूर येथे महिलांसाठी भव्य ‘ॲनिमिया मुक्त गाव अभियान’ आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या विशेष अभियानामध्ये प्रामुख्याने…
सांग भाऊ कुठल्या देवळात येऊ , अन् कोणत्या देवाची शपथ खाऊ, एक दिवसाचा का होईना एकदाच सरपंच होऊ
पदासाठी आपण भाऊ, भाऊ… निष्ठा,प्रामाणिकपणा, गावकी, भावकी, सर्वांगीण विकास, सर्वसामान्य जनता, पॅनल, कार्यकर्त्यांच जेंव्हाच्या तेव्हा पाहू, खुर्चीसाठी उदास मानसिकतेच्या भकास राजकारणाची गजकर्ण अवस्था…चमत्कार पाहा देवादिकांचा, खुर्चीसाठी खेळ चाले शपथांचा… कोरेगाव भिमा (ता.शिरूर) दि. २८ नोव्हेंबर “सांग भाऊ कुठल्या देवळात येऊ, अन् कोणत्या देवाची शपथ खाऊ, एक दिवसाचा का होईना भाऊ आपण एकदाच सरपंच होऊ.” अशी…
भावनांना मोकळी वाट दिली की जीवन सुंदर होतं : वसंत हंकारे
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर – कोंढापुरी (ता. शिरूर) : “टाळी वाजवली की मन हलकं होतं, शरीरात सकारात्मक ऊर्जा उसळते, मनुष्य मोकळा होतो, रडायला आलं तर रडा, व्यक्त व्हा, मनातलं मनात न ठेवता मोकळं करा. भावनांना मोकळी वाट दिली की जीवन सुंदर होतं ” असे प्रभावी प्रतिपादन वसंत हंकारे यांनी केले. कोंढापुरी येथील मल्हारगडावर सुरू असलेल्या…
शिक्रापूर येथील चासकमान वसाहतीजवळ एस टी बसथांबा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर) – शिक्रापूर-मलठण फाटा परिसरातील चासकमान वसाहत व शुभम हॉटेलसमोर एस.टी. बसथांबा सुरू करण्यात यावा, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. यापूर्वी चासकमान कॉलनीसमोर बस थांबा होता; मात्र प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता तो अचानक बंद करण्यात आला. त्यामुळे पुणे व शिरूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत…
काशी दशाश्वमेध घाटावर भक्तांचे स्वर—“भगवंता! आमच्या किरणची सर्व स्वप्ने पूर्ण कर!”
लोणीकंद–पेरणे गटातील भाविकांनी अनुभवली काशी विश्वनाथ दर्शन यात्रा आणि गंगेची दिव्य आरती, पै. किरण साकोरे यांचा सेवाभाव वाराणसी/पुणे – काशी ही भक्ती, अध्यात्म आणि शांततेने नटलेली नगरी. रविवारी सायंकाळी दशाश्वमेध घाटावर गंगेच्या आरतीचा दिव्य सोहळा सुरू होताच संपूर्ण घाट दीपज्योतींनी उजळून निघाला. लालसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर लहरणाऱ्या ज्योती, शंखनाद, घंटांचा निनाद आणि कापूराचा सुवास यामुळे येथे…
