
Category: स्थानिक वार्ता

युवकांनी उद्योगधंदे उभारत जिद्दीने चालवत इतरांना रोजगार देणारे व्हावे – आमदार अशोक पवार
सणसवाडी (ता. शिरूर) युवकांनी उद्योगधंदे उभारत जिद्दीने चालवत इतरांना रोजगार देणारे व्हायला हवे. उद्योग एका दिवसात उभा राहत नाही त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत व्यवसायात झोकून द्यावे लागते तेंव्हा व्यासायात यश मिळते त्यासाठी सातत्याने कष्ट,त्याग,नियोजन व उत्तम व्यवस्थापन गरजेचे असल्याचे आमदार अशोक पवार यांनी गुंतवणूक आणि विमा सल्लागार साईनाथ साहू व शंभूनाथ साहू यांच्या एसएस ब्रदर्स…

आली गवर आली.. सोन पावली आली..! कोरेगाव भिमा येथे गौराईचे मोठ्या भक्तिभावात स्वागत..
कोरेगाव भिमा येथे शिनगारे कुटुंबियांकडून आकर्षक देखावा,सुग्रास भोजनासह रांगोळ्या, सडा शिंपण, पारंपारीक वेशभूषा, फेर धरत, गाणी म्हणत गौराईचे स्वागत कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे आली गवर आली.. सोन पावली आली..! अशी गौरी गीते गात गौराईचे आवाहन करण्यात आले. दारी आलेल्या गौराईला लिंबलोण करत सुवासिनिंनी माहेरवाशिणी गौराईचे मंगळवारी (दि. १०) घरोघरी उत्साहात स्वागत करण्यात…

उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस ॲक्शन मोडवर
बेशिस्त दुचाकी चालकांवरिल कारवाईचे नागरिकांमधून स्वागत प्रतिनिधी नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी गाड्यांच्या कर्णकर्कश हॉर्न,फटक्यासारखा आवाज काढणे, कवणा हेल्मेट,अपलवयीन मुलांनी वाहन चालवणे ,बेशिस्तपणे वेगाने वाहन चालवणे यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उचलण्यात येत असून उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे निरीक्षक शंकर पाटील अँक्शन मोडवर आले असून बेशिस्त वाहन चालकांनी चांगलाच धसका घेतल्याचे…

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनिल सातव यांची स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सेवेसाठी कटिबध्द राहणार – अनिल सातव वाघोली (ता.हवेली) येथे रस्त्याची झालेली दुरवस्था,नागरिकांचे होणारे अपघात, शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास, सतत जॅम होणारे ट्रॅफिक व नागरिकांना सतावणारी अपघाताची भीती यातून नागरिकांच्या अडचणींना सोडवण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव यांनी स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करत सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केल्याने…

बहुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी रुपाली वाडेकर यांची बिनविरोध निवड
खेड तालुक्यातील बहुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी रुपाली बापू वाडेकर यांची आदर्श लोकनियुक्त सरपंच अश्विनी संदिप साबळे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच संगीता प्रताप वाडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी रुपाली वाडेकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. निवडणूक अधिकारी व ग्रामविकास अधिकारी स्वाती माळी यांनी वाडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे…

धक्कादायक! तुला गोळ्या घालून तळ्यामध्ये पुरून टाकणार असे धमकावत अंडाभुर्जी विक्रेत्याचे अपहरण व अमानुष मारहाण
कायद्याला हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही -पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड शिक्रापूर – कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे एका अंडाभुर्जी विक्रेत्याला चार जणांच्या टोळक्याने जबरदस्तीने स्विफ्ट गाडीत अपहरण करून, तुला गोळ्या घालून तळ्यात पुरून टाकण्याची धमकी देत लाकडी दांडके आणि बांबूने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुण्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत…

धक्कादायक !शिरूर तालुक्यात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
दि. ०४ सप्टेंबर – आलेगाव पागा (ता.शिरूर) येथे एक धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारा निंदनीय घृणास्पद प्रकार उघडकीस आला असून फिर्यादी च्या घरासमोरील पढवीत १३ वर्षांच्या अल्पवयीन पीडितेसोबत इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अशोक सोनवणे (रा. आलेगाव पागा ता. शिरूर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला शिरूर पोलिसांनी…

वाचनाने समृद्ध जीवन आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व घडते – सरपंच रुपाली दरेकर
सणसवाडी (ता. शिरूर) वाचन हे जीवनातील महत्त्वाचे साधन आहे, जे माणसाला ज्ञानी बनवते, जीवनाला योग्य दिशा देते.वाचन माणसातला माणूस घडविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते त्याचे व्यक्तिमत्त्वही समृद्ध होते म्हणून वाचाल तर वाचाल असे प्रेरणादायी विचार सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली दगडू…

‘महाराष्ट्र आयडॉल’ पुरस्काराने आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस सन्मानित
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) ग्रामपंचायतचे आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तुकाराम सात्रस यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र आयडॉल २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ, आणि जागृत शोध वृत्तपत्र यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सात्रस यांना हा सन्मान मिळाला. राजेंद्र सात्रस यांनी…

पिंपळे जगताप येथे साडे पाचशे महिलांच्या उपस्थितीत मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
पिंपळे जगताप ( ता.शिरूर) येथे पारंपारिक नऊवारी साडी, नथनी, केसात माळलेला गजरा, हिरवा चुडा आणि पारंपरिक खेळ आणि गाणी गात वेशात साडे पाचशे महिलांच्या उपस्थितीत मंगळा गौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत पिंपळे जगताप आयोजित श्री.सूर्यकांत र.शिवले यांचे व्याख्यान. महिलांना बचत गटाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.बचत गटाचे महत्व, बचत गटा मार्फत आपण व्यवसाय…