Category: स्थानिक वार्ता
कोरेगाव भीमा येथील ३ मुलांचे अपहरण करून ७ वर्षीय मुलीचा खून करणारा आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी केले जेरबंद दिनांक ११ मार्च , कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यापैकी एका ७ वर्षीय मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.याप्रकरणी मुलीची आई बिनादेवी रंजित रविदास (वय ३४, रा. आदित्य पार्क सोसायटी, कोरेगाव भिमा ता. शिरूर) यांनी…
शिरुरमधील कारेगाव येथे इन्स्टाग्रामवर मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अत्याचार करणाऱ्या विधी संघर्षित बालकास पोलीसांनी घेतले ताब्यात दिनांक ९ मार्च – सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर ओळख आणि मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी १६ वर्षीय विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता व ६ मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास कारेगाव ता.शिरूर जि पुणे…
सक्षम महिला हीच सुदृढ व विकसित कुटुंबाचा पाया असून स्त्रियांच्या सन्मानातच समाजाची प्रगती आहे – आदर्श सरपंच रमेश गडदे
शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने किशोरवयीन मुलींना सायबर सुरक्षा आणि आरोग्य विषयावर मार्गदर्शन, सॅनिटरी नॅपकीन वाटप, सॅनिटरी नॅपकिन डिसपोजल मशीन व महिलांसाठी स्वच्छतागृह अशा उपक्रमांनी आदर्श महिला दीन साजरा शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील आधुनिक युगात सक्षम महिला हीच सुदृढ व विकसित कुटुंबाचा पाया असून महिलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करून देणे तेथे त्यांना सुरक्षित वातावरण देणे…
आम्ही कर्तव्य बजावत असतो, परंतु सी सी टी व्ही बसवून खरं कर्तव्य, “कर्तव्य फाउंडेशन” ने बजावले आहे – पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड
कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर बस स्थानकात महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसवले सीसीटीव्ही कॅमेरे शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस कर्मचारी समाजाचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून आम्ही कर्तव्य बजावत असतो परंतु खरं कर्तव्य कर्तव्य फाउंडेशन ने आज बजावले असून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या, युवतींच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे व आदर्श कार्य कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून झाले असल्याचे प्रतिपादन कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने…
धक्कादायक ! सणसवाडीत महिलेवर बलात्कार
दिनांक ५ मार्च – सणसवाडी (ता. शिरुर) येथे महिलेला मारहाण करीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओंकार रामकिसन गायकवाड (वय २०, रा.हॉटेल पाटीलवाडा शेजारी एक अँड ती फाटा शेजारी सणसवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पिडीत महिलेची ओंकार गायकवाड याच्याशी ओळख झाल्यानंतर ओंकार याने महिलेच्या घरी जाऊन…
फक्कडराव बाबुराव दरेकर यांचे वृद्धापकाळाने निधन
सणसवाडी (ता.शिरूर) फक्कडराव बाबुराव दरेकर ( वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांचे सणसवाडी पंचक्रोशितील धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात महत्वाचे योगदान होते. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. वारकरी विचारांचे शांतसंयमी व इतरांना मदत करणारे अशी त्यांची सामाजिक ओळख होती. योग्य आहार, सद्विचार, शांत निर्मळ स्वभाव व इतरांना नेहमी मदतीचा हात यामुळे…
श्री काळभैरवनाथ महाराजांच्या चरणी माजी आमदार अशोक पवार नतमस्तक
सणसवाडी ( ता.शिरूर) येथे ग्राम दैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिराचा १३ व्या वर्धापन दिनानिमित्त माजी आमदार अशोक पवार यांनी दर्शन घेतले. शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी सणसवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे धार्मिक कार्यात सहभाग घेतला. श्री काळभैरवनाथ महाराजांच्या चरणी माजी आमदार अशोक…
कर्तव्य फाउंडेशनच्या आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कर्तव्य फाउंडेशन व बाल रंगभूमी परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच स्वप्नपूर्ती फाउंडेशन, ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान, नेत्र व शुगर तपासणी शिबिरास वृद्ध, महिला व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी लाठी काठी प्रशिक्षण देणारे तांबे सर, टोके सर, भूषण घोलप यांनी युवती, महिला भगिनी यांना लाठी काठी प्रशिक्षण देत…
दुष्काळाला हरवणारा महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार म्हणजे! पाणीदार केंदूर – अमेरिकेतील वॉटर फॉर पीपल सीईओ मार्क डूये
दिनांक २ मार्च केंदूर (ता. शिरूर) येथील जलआत्मनिर्भरतेसाठी सुरू असलेल्या पाणी पुनर्भरणाच्या प्रकल्पात चार वर्षांपूर्वी जलआरेखन करून गावातील जलस्त्रोत, जुने पाझर तलाव व तत्सम माहिती संकलित करणारे जलतज्ञ डॉ. सुमंत पांडे यांच्या टीमने गावाचा जलआराखडा तयार केला. या आराखड्यानुसार ३५०० हेक्टर परिसरातील जलस्तर सुधारून गावाला स्वावलंबी बनवण्याची दिशा आखली गेली.अनाई यातून महाराष्ट्रातील अनोखा चमत्कार घडला…
पुण्यात दरोडेखोरांचा पोलीस उपायुक्तांच्या छातीवर व फौजदाराच्या हातावर कोयत्याने वार; प्रत्युत्तरादाखल पोलिसांचा गोळीबार
पुणे – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जऱ्हाड हे जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला.या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जराड जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री ही थरारक घटना घडली…
