शिक्रापूर येथे आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेविकांचा गौरव
शिक्रापूर (ता.शिरूर) येथील आधार फाउंडेशन आणि विद्याधाम प्रशाला यांच्या वतीने शिक्रापूरमधील आरोग्य सेविकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समाजासाठी आरोग्य सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला दाद देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक गंगावणे होते. यावेळी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष खैरे, डॉ. प्रतीक्षा आठवले, आरोग्य सहायिका अवनी आल्हाट, सुजाता खैरे, पल्लवी…
