लोणीकंद पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सर्जेराव कुंभार यांचे हृदयविकाराने निधन
पोलीस दलावर शोककळा, ‘सुरक्षित पुणे’ पुरस्काराचे मानकरी; शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्वाला हृदयविकाराचा काळा घाला दिनांक १ फेब्रुवारी लोणीकंद (ता.हवेली) कर्तव्यदक्षता आणि संयमी स्वभावाचा आदर्श असलेले लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत निष्ठेने ड्युटी बजावून घरी परतलेल्या या हसतमुख…
