पाहुनी समाधीचा सोहळा | दाटला इंद्रायणीचा गळा.. माऊलींच्या ७२८व्या संजीवन समाधी सोहळ्याचा भक्तिमय उत्सव
ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम… असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष… दुपारचे १२ वाजले आणि घंटानाद.. समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी… संत नामदेव महाराज व माउलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे… अशा भावपूर्ण वातावरणात माउलींचा ७२८वा संजीवन समाधी सोहळा ‘माउली – माउलीं’च्या जयघोषात पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत…