कलेक्टर ते ग्रामपंचायत… सर्वांची ताकद फळाला! कोरेगाव भिमा-पेरणे बंधाऱ्याचे काम अखेर युद्धपातळीवर सुरू
कोरेगाव भिमा (ता. शिरूर): गेल्या काही महिन्यांपासून चिंतेत असलेल्या कोरेगाव भिमा परिसरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटल्याने निर्माण झालेला पाण्याचा गंभीर प्रश्न आता मार्गी लागणार असून, बंधाऱ्याच्या ‘की-वॉल’ (संरक्षक भिंत) बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पाठपुराव्याला यश; पाणीप्रश्न सुटणार – सुमारे ३७ वर्षांपूर्वी बांधलेल्या या…
