युवकांनो, राष्ट्रहिताला प्राधान्य द्या: प्राचार्य डॉ. संजय चाकणे
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे बलशाली भारताच्या निर्मितीसाठी राष्ट्रनिष्ठा आणि समर्पणाची भावना असणाऱ्या युवकांची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य आणि प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि शैक्षणिक संशोधन…
