धक्कादायक! कोरेगाव भीमा येथे भीषण अपघात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
पोलिस भरती करण्यासाठी आलेल्या युवकाचा दुर्दैवी अंत, पुणे-नगर महामार्गावर रक्ताचा सडा कोरेगाव भीमा (ता.शिरूर) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज सायंकाळी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वाडा पुनर्वसन फाट्याजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात मोठ्या वाहनाने (टेम्पो) दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला…
