धक्कादायक! पुण्यात हॉटेलमधील कामगारांनी ग्राहकांना नाष्ट्याऐवजी दिला चोप

Swarajyatimesnews

ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून वाद, फावड्यानेही करण्यात आली मारहाण

हॉटेलमध्ये ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून हॉटेलमधील कामगारांनी दोन ग्राहकांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास बावधनमधील सेंदूर सरवाना भवन हॉटेलमध्ये घडली असून याप्रकरणी अर्थव मनोहर दगडे (वय २१, रा. पाटीलनगर, बावधन, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सेंदूर सरवाना भवन हॉटेलमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्थव आणि त्यांचा मित्र असे दोघेजण बावधनमधील सेंदूर सरवाना भवन हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले होते. तिथे ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी हॉटेलमधील दोघांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर जवळ पडलेल्या फावड्यानेही मारहाण केली. या मारहाणीमध्ये फिर्यादी अर्थव यांच्या डाव्या कानाच्या पाठीमागील बाजूस, कानाला व डाव्या हाताच्या अंगठ्याला मार लागला आहे. तसेच फिर्यादी यांच्या सोबत असलेल्या मित्राला सुद्धा मार लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!