शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी
वाघोली (ता. हवेली) – भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. २१ ते २७ फेब्रुवारी दरम्यान बीजेएस सायन्स फेस्टअंतर्गत पोस्टर प्रेझेंटेशन, शास्त्रीय प्रकल्प स्पर्धा, प्रश्नमंजुषा व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजीव चिकाटे यांनी “विज्ञान आणि संधी” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्योजक राजू वाव्हळ यांनी प्रिंटिंग क्षेत्रातील व्यवसाय संधींविषयी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारताच्या प्राचीन संस्कृतीवर भाष्य केले.
उद्योजक राजू वाव्हळ यांनी विद्यार्थ्यांना प्रिंटिंग क्षेत्रातील व्यवसाय संधी व विज्ञानामुळे या क्षेत्रात झालेली प्रगती याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन व भारतातील प्राचीन संस्कृती याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास बी.जे.एस. प्रबंध समिती सदस्य सुरेश साळुंके, विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, उपप्राचार्य गेठे पी. पी. यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनिषा बोरा यांनी केले, आभार डॉ. माधुरी पगारिया यांनी मानले तर सूत्रसंचालन कु. साक्षी जगताप हिने केले. या कार्यक्रमासाठी आयक्युओसी समन्वयक डॉ. माधुरी देशमुख, विभाग प्रमुख डॉ. रुपाली गुलालकरी, डॉ. देविदास पाटील, डॉ. शिवाजी सोनवणे, प्रा. चक्रधर शेळके, प्रा. दिनेश गायकवाड, डॉ. स्वाती कोलट, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. प्रदीप आव्हाड, प्रा. विपुल घेमुड, विलास पाटील व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.