केसनंद (ता. हवेली): सुरेखा रमेश हरगुडे व संतोष पांडुरंग हरगुडे (एस.पी.) यांच्या संकल्पनेतून तसेच रमेश बापू हरगुडे मित्र परिवार, केसनंद ग्रामविकास प्रतिष्ठान आणि मिलिंद नाना हरगुडे मित्र परिवार यांच्या नियोजनातून आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या काशी–अयोध्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शनिवार, दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता ही विशेष रेल्वे हडपसर रेल्वे स्थानकावरून मोठ्या भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात रवाना झाली. यावेळी भाविकांच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.

या प्रसंगी हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती मिलिंद हरगुडे, उपसरपंच प्रमोद हरगुडे, नितीन गावडे, प्रणाली तांबे, विलास तांबे, निलेश रिकामे, राजेंद्र सावंत, वाल्मिक आबा हरगुडे, विकास गायकवाड, तयाजी चौधरी, मनोज चौधरी, दीपक चौधरी, मंगेश चौधरी, अमित चौधरी, अलका सोनवणे, सागर तांबे, विजय तांबे, सोमनाथ हरगुडे, ज्ञानेश्वर हरगुडे, तानाजी हरगुडे, चंद्रकांत केसवड, सतीश ढवळे, सुखदेव कांबळे, अमोल चौधरी, राजेश कोतवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुसज्ज नियोजन व आरोग्य सुविधा – या यात्रेसाठी प्रवाशांच्या सोयीसाठी चहा, नाश्ता, दूध, बिस्किटे, शुद्ध पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टर व मदतनिसांचे पथक, सुरक्षा रक्षक तसेच शेकडो स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवास, मुक्काम व दर्शन व्यवस्था शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक राबवण्यात आली असून यात्रा आनंदात व सुरक्षिततेत पार पडणार आहे.
उद्योजक रमेश हरगुडे व ग्रामपंचायत सदस्या तसेच कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुरेखा रमेश हरगुडे यांनी सर्वसामान्य जनतेशी जपलेले जिव्हाळ्याचे नाते, सेवाभावी वृत्ती आणि विकासाचा ध्यास यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
