केसनंदचे शेतकरी पुत्र व उद्योजक रमेश (बाप्पु ) हरगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन 

Swarajyatimesnews

 

शेतकऱ्याच्या मुलाने घडविला उद्योग आणि सेवेचा अद्भुत संगम

केसनंद (ता. हवेली): पूर्व हवेली तालुक्यातील केसनंद गावाचे सुपुत्र, यशस्वी उद्योजक आणि जनसामान्यांचे आधारस्तंभ रमेश उर्फ बापूसाहेब हरगुडे यांचा वाढदिवस आणि गावातील नर्मदेश्वर मंदिराचा वर्धापन दिन एकाच दिवशी साजरा होत आहे. या दुहेरी सोहळ्यामुळे केसनंद नगरीत अभूतपूर्व धार्मिक व सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा उत्सव म्हणजे गावाने आपल्या ‘बाप्पू’बद्दल व्यक्त केलेला अमर्याद आदर आणि प्रेम आहे.

रमेश (बाप्पु ) हरगुडे यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून स्नेहभोजन व सांस्कृतिक  कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे 

 शून्यातून उद्योगविश्व: ग्रामीण तरुणाईला नवी प्रेरणा केसनंद सारख्या निमशहरी गावातील एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रमेश बापू हरगुडे यांनी माती आणि शेतीच्या संस्कारांना जपत उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतली. कोणताही औद्योगिक वारसा नसताना, त्यांनी केवळ प्रामाणिक कष्ट, दृढनिश्चय आणि सातत्याच्या बळावर आपले उद्योगविश्व उभे केले. त्यांचे यश हे ग्रामीण भागातील तरुणांना एक कृतीयुक्त उदाहरण देत आहे.त्यांनी तरुणाईला दिलेला मोलाचा मंत्र आजही मार्गदर्शक ठरतो आहे.

 “मराठी माणूस उद्योगात मागे नाही; फक्त मनावर घ्या, स्वतःला झोकून द्या आणि स्वतःला सिद्ध करा.” – असे आवाहन त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांना केले.

हजारो भाविकांना घडविले देवादिकांचे दर्शन : उत्तम आयोजन नियोजन व व्यवस्थापन करत काशी येथील विश्वेश्वराचे व अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम  भगवान श्रीराम यांच्या दर्शनासाठी केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील हजारो भाविक भक्तांना घेऊन जात विश्वेश्वराचे दर्शन गंगा आरती व राम लल्लाचे दर्शन घडवले यामुळे  श्रावण बाळ अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून त्यांच्या पत्नी सुरेखा रमेश हरगुडे यांना या जिल्हा परिषद गटातील उमेदवारी जाहीर झाले असून त्यांना लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. 

आदमापुर येथील बाळूमामाचे कोल्हापूर येथील महालक्ष्मी अंबाबाईचे तुळजापुरातील कुलस्वामिनी आई जगदंबेचे व अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन ट्रॅव्हलवरच्या माध्यमातून हजारो भाविकांना घडवल्याने त्यांच्याविषयी सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक वेगळीच असता व आपुलकी निर्माण झाली आहे. 

 धार्मिक आणि सामाजिक सेवेचा अलौकिक ठसा : व्यवसायात स्थिरावल्यानंतर बापूसाहेब सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये हिरीरीने सहभागी झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित झालेल्या काशी-अयोध्या रेल्वे यात्रांना हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच, अदमापूर बाळूमामा, कोल्हापूर अंबाबाई, तुळजाभवानी यांसारख्या धार्मिक स्थळांच्या यात्रांचे उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध आयोजन करून त्यांनी धार्मिक कार्यातही आपला ठसा उमटवला. प्रवाशांची काळजी घेण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते भक्ती आणि विश्वासाचे प्रतीक बनले आहेत.

 लोकसंग्रहाची ताकद: आमदार माऊली कटके यांचा ठाम विश्वास –  उद्योजक रमेश उर्फ बापूसाहेबांच्या लोकसंग्रहाची आणि जनमानसातील त्यांच्या लोकप्रिय निष्ठेची साक्ष म्हणजे पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी त्यांच्या पत्नी  सुरेखा रमेश हरगुडे यांची जाहीर केलेली उमेदवारी होय. हा केवळ राजकीय निर्णय नसून, हरगुडे कुटुंबावर असलेले जिल्हा परिषद गटातील लोकांचे प्रेम आणि विश्वासाचा हा सज्जड पुरावा मानला जातो.

सर्वसामान्यांचा विश्वास : “रमेश बाप्पू म्हणजे शब्दाला जागणारा माणूस आणि लोकांच्या कामासाठी स्वतःहून पुढे येणारे नेतृत्व!”

 गावाचे ‘हक्काचे माणूस’: सर्वांचे सुख-दुःखाचे साथीदार : रमेश बाप्पू यांची खरी ओळख त्यांच्या साधेपणात आणि माणुसकीत आहे. ते कोणासाठी जिवलग मित्र, कोणासाठी मोकळ्या मनाचा माणूस, तर कोणासाठी कुटुंबातील आधारस्तंभ आहेत.

 ज्येष्ठांचा आधारस्तंभ आणि तरुणांचे प्रेरणास्थान : महिला भगिनींसाठी हक्काचा भाऊ आणि अडचणीत धावून जाणारे नेते, सदैव इतरांना मदत करणारे हसतमुख व्यक्तिमत्त्व. या सर्व गुणांमुळे त्यांनी अजातशत्रू म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आलेल्या अपयशापेक्षा यश मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि गाव-शिवाराशी असलेली प्रामाणिक नाळ यामुळे त्यांच्या आयुष्यात यशाचे नंदनवन फुलले आहे.

घाटात बसली १२ सेकंदाची बारी : नुकतीच केसनंद ग्राम देवता माता जोगेश्वरीच्या यात्रेत भव्य बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडल्या. यावेळी रमेश हरगुडे यांच्या नावाने पळालेल्या बैलगाड्याने घाट गाजवत अवघ्या बारा सेकंदात बारी बसवली. लोकांनी फेटे उडवले कोणी घोषणा दिल्या हा विक्रम नोंदवल्यानंतर घाटातही “बाप्पूंच्या नावाचा गजर” झाला. या घटनेतून त्यांची लोकप्रियता केवळ सामाजिक-राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित नसून, लोककला आणि ग्रामीण खेळांमध्येही किती रुजली आहे, हे सिद्ध होते. ग्रामस्थांना विश्वास आहे की, “आगामी निवडणुकी बाप्पूंच्या नावाने बारी बिनविरोध बसेल, आई जोगेश्वरीच्या भूमीतील या सुपुत्राचे स्वप्न साकार होईल अशी चर्चा चांगलीच रंगली होती.

 केसनंदचे अनमोल रत्न: प्रेम आणि आदराचा उत्सव आज रमेश बाप्पू हरगुडे हे केसनंद गावासाठी केवळ उद्योजक नाहीत, तर प्रेरणादायी नेतृत्वाचे प्रतीक आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे हे आयोजन ग्रामीण संस्कृती, धार्मिक आस्था आणि सामाजिक एकात्मतेचा महासंगम ठरले आहे.केसनंदचे हे जिवलग आपला माणूस ‘ नावाने लोकांच्या मनात स्थान निर्माण करले असून आपल्या गुणांनी गावाचे नाव सर्वत्र उज्वल करत राहो, हीच सदिच्छा! ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!