“जनता जनार्दनाचे प्रेम आणि मायेची शिदोरी घेऊन आम्ही देवाच्या दारी जात आहोत.” – पै. किरण संपत साकोरे
पुणे,हडपसर रेल्वे स्थानकावरून देवदर्शन यात्रेचे काशी-अयोध्याकडे भव्य प्रस्थान
हडपसर (ता. हवेली) : सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणाने हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी घेऊन जाणे, ही एक अद्वितीय कामगिरी ठरली आहे. सेवाभावी वृत्ती असलेल्या पै. किरण साकोरे यांना जनतेचा उदंड आशीर्वाद लाभेल आणि त्यांची राजकीय स्वप्ने जनता जनार्दन पूर्ण करेल, असा विश्वास मोफत देवदर्शन यात्रेच्या प्रस्थान वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पिडीसीसी बँकेचे संचालक तसेच भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद यांनी व्यक्त केला.
हडपसरहून यात्रेचे भव्य प्रस्थान – ‘प्रदिपदादा कंद युवा मंच’ व ‘पै. किरण साकोरे मित्र परिवार’ यांच्या वतीने आयोजित काशी विश्वनाथ–अयोध्या देवदर्शन यात्रेची पहिली रेल्वे दिनांक ५ नोव्हेंबर रोजी पुणे–हडपसर रेल्वे स्थानकावरून जय श्रीराम घोषणांच्या गजरात रवाना झाली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद यांच्या हस्ते पूजन करून हिरवा झेंडा दाखवत रेल्वेला प्रस्थान करण्यात आले. यावेळी पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र कंद, हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती संजीवनी कापरे, माजी सरपंच मंदाकिनी साकोरे व किरण साकोरे यांच्यासह आजी माजी सरपंच,उपसरपंच , संचालक, व विविध पदाधिकारी यांच्या मुख्य उपस्थितीत रवाना झाली.

भक्ती, समर्पण आणि सामाजिक एकतेचा सोहळा – लोणीकंद–पेरणे परिसरातील हजारो भाविकांसाठी हा दिवस उत्सवमय ठरला. “जनता जनार्दन रुपी मायबापांच्या आशीर्वादाने माझे स्वप्न पूर्ण होत आहे,” असे भावनिक उद्गार पै. किरण साकोरे यांनी काढले.
त्यांचे हे शब्द श्रद्धा, नम्रता आणि समाजसेवेच्या भावनेचे प्रतीक ठरले.

सुयोग्य नियोजन व उत्कृष्ट व्यवस्था – यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी या यात्रेचे आयोजन शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पिडीसीसी बँकेचे संचालक तसेच भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष तथा भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पै.संदिप भोंडवे,यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप,हवेली तालुका.पं.समितीचे मा.उपसभापती ज्ञानेश्वर वाळके,पुणे,हवेली कृ.उ.बाजार समितीचे मा.उपसभापती तथा संचालक रविंद्र कंद,जिल्हा परिषदेचे मा.सदस्य शंकर भुमकर,हवेली पं.स.च्या मा.उपसभापती संजीवनी कापरे व थोर,मोठ्या ज्येष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
प्रत्येक गावातील भाविकांसाठी वाहन व्यवस्था, रेल्वे स्थानकावर अल्पोपहार, प्रवासासाठी आवश्यक वस्तूंची सोय आणि वैद्यकीय पथकाची साथ अशा सर्व सुविधा यात्रेकरूंना देण्यात आल्या असून त्यांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक आहेत.
सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश – या यात्रेमुळे केवळ लोणीकंद–पेरणेच नव्हे, तर संपूर्ण हवेली तालुक्यात श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश पोहोचला आहे. भक्ती, समर्पण आणि सेवाभाव या तिन्हींच्या संगमातून समाजात नवी ऊर्जा निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
जयघोषात दुमदुमले हडपसर रेल्वे स्थानक – हडपसर रेल्वे स्थानक तुतारीच्या ललकारीत, हलगीच्या ठेक्यात ताशा कडकडाटामध्ये चांगलेच दुमदुमले होते.येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे अनोखे स्वागत करण्यात येत होते तर जय श्री राम, जय जय श्री राम, हर हर महादेव अशा भक्तिमय घोषणांनी हडपसर परिसर दुमदुमला होता, वारकरी भजनी मंडळी जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा अशा भक्तिमय सुरांनी परिसर न्हाऊन निघाला होता तर तरुणींनी रडू नको बाळा मी पाण्याला जाते अशा गवळणीचे गायन केले या मंगलमय वातावरण भाविकभक्त मंत्रमुग्ध व भक्तिमय झाले होते.
“जनता जनार्दन रुपी मायबापांच्या आशीर्वादाने काशी विश्वनाथ व अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या दर्शनासाठी दर्शनासाठी सर्वसामान्य जनता जनार्दनास घेऊन जाण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे. हे जनतेचे प्रेम आणि मायेची शिदोरी घेऊन आम्ही देवाच्या दारी जात आहोत.” .” – पै. किरण संपत साकोरे
