शिरूरमध्ये बंद घर फोडून ६२ हजारांचे दागिने चोरीला

Swarajyatimesnews

शिरूर शहरातील गुजरमळा भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २४ मे रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत घडली. माधुरी नारायण तरटे (वय ३५, रा. गुजरमळा, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधुरी तरटे या कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेल्या असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातून ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन जोड कानातले (अंदाजे किंमत ४२,००० रुपये) आणि २.५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी (अंदाजे किंमत २०,००० रुपये) असा एकूण ६२,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक जगताप करत आहेत. पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी (प्रभारी अधिकारी, शिरूर पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!