पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Searajyatimesnews

पुणे – पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या नेतृत्वात मोठा बदल झाला असून, संदीपसिंग गिल यांनी नवे पोलिस अधीक्षक (SP) म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या कार्यकाळाकडून कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

गृह विभागाच्या आदेशानुसार, गिल यांची बदली ५ सप्टेंबर २०२४ रोजीच निश्चित झाली होती. मात्र, तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बदलीविरोधात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (CAT) याचिका दाखल केली होती. त्यामुळे ही नियुक्ती तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. आता देशमुख यांची नियुक्ती पुणे शहराचे अपर पोलिस आयुक्त म्हणून झाल्याने संदीपसिंग गिल यांची नियुक्ती निश्चित झाली आहे.

संदीपसिंग गिल यांनी पुणे शहरात  कायदा-सुव्यवस्था राखण्यात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांनी गणेशोत्सव काळात शांतता व  गणपती विसर्जन मिरवणुकांचे केलेले नियोजन, शहरातील गुन्हेगारीवर वाचक व नियमांत ठेवण्यासाठी कठोर उपाय करत अल्पवयीन गुन्हेगारांसाठी सुधारात्मक व पुनर्वसन उपक्रम, नागरिकांसोबत संवाद आणि विश्वास निर्माण करणारे उपक्रम, उपक्रम राबवले होते.

पुणे जिल्हा ग्रामीण भागात वाढणारी गुन्हेगारी, सायबर क्राइम, ग्रामीण भागातील पोलिस यंत्रणेचा सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी होणारा प्रभावी वापर, पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासह, पुणे नगररोड,सोलापूर रोड,चाकण यासह ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी,मोटर वाहन चोरी, अवैध वाळू उत्खनन, स्मार्ट शहर सीमांलगत असलेले गुन्हेगारी गटांचे गुन्हेगारी क्षेत्र, वाहतूक व्यवस्था आणि ग्रामसुरक्षा यामध्ये सुधारणा, यावर गिल यांना लक्ष द्यावे लागेल.

   ग्रामपातळीवर “माझे कुटुंब, माझी जबाबदारी”, “ग्राम सुरक्षा दल, सायबर सिक्युरिटी, पोलिस प्रशासन व सर्वसामान्य नागरिक यांच्यात संवाद वाढवत, सुरक्षितता व जनजागृती कार्यक्रमांमध्ये नागरिक व पोलिसांचा सहभाग वाढवणे, महिला सुरक्षा, सायबर क्राईम सेल सशक्त करणे या बाबतीत पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्याकडून प्रभावी कार्याची अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!