Category: Uncategorized
JSPM च्या विद्यार्थ्यांनी AI वर आधारित शेतीसाठी बनवले क्रांतिकारी अॅप
अॅपद्वारे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, माती परीक्षण, उत्पादन खर्चाचे मूल्यांकन, तसेच आधुनिक शेतीत वापरण्यात येणाऱ्या पद्धतींबाबत मिळणार माहिती पुणे – जेएसपीएमच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च (BSIOTR), वाघोली येथील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील चार विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी AI-ML आधारित अॅप तयार केले आहे. श्रीहर्ष देशमुख, अमन कुमार, अनिश बनसोडे आणि प्रितेश बिरादार यांनी तयार…
माता रमाईच्या संघर्षमय पैलूंना बार्टी देणार उजाळा
पुणे, २७ मे २०२५ – महापुरुषांच्या यशात त्यांच्या सहचरणींचे योगदान महत्त्वाचे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनावर “रमाई संशोधन प्रकल्पा”द्वारे बार्टी संस्था प्रकाश टाकणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली. बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था), पुणे येथे रमाई यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन…
कोरेगाव भीमा येथे क्षणात माकडाच कुटुंब उध्वस्त करणारी शोकांतिका, ती गेली… पिल्लूही गेलं… पण तो अजूनही थांबलेला, कोरड्या डोळ्यातील वेदना हृदयाला भिडणारी..
शब्दात नव्हे तर कृतीत जगणारी, माणुसकी ,प्रेम शिकवणारी अबोल निष्ठावान प्रेमाची हृदयस्पर्शी वेदना कोरेगाव भीमा (ता.शिरूर) आदर्श चौकात एक हृदयस्पर्शी दुर्घटना घडल्याने माणसांचे मन प्रेमाने ओथंबून जाते आणि नकळत डोळे पाणावतात,“ती माकडीण गेली… तिचं छोटंसं पिल्लूही गेलं… पण त्या दोघांच्या मृतदेहाजवळ, अजूनही थांबून आहे एक माकड — न हलणारं, न काही खाणारं, फक्त त्यांच्याकडे पाहणारं….
शिरूर बसस्थानकावर पर्समधून ८ तोळे सोन्याची चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक
शिरूर – शिरूर बसस्थानकावर पर्समधून ८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढणाऱ्या दोन महिला चोरट्यांना शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. चोरी गेलेले सर्व सोनं हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही घटना ११ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली. रूपाली अनिल काळेल (रा. त्रिमूर्ती नगर, बारामती) या आपल्या मुलगी व भाचीसह एसटीने बारामतीला जात…
शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत ३५ वर्षांनी भरला स्नेहमेळावा
शिक्रापूर (ता.शिरूर) : विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर येथील सन १९९०- ९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या वेळी जुन्या वर्गमित्रांना भेटून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आयुष्यात केलेल्या प्रगती, सुखदुःखाची, आशापयश यांची उजळणी करण्यात आली. या कार्यक्रमास शाळेचे जेष्ठ मार्गदर्शक गुरुजन बांगर सर, साकोरे सर, सूर्यकांत शिर्के सर,…
लोणंद येथे होणार संत ज्ञानेश्वर माऊली व कान्हुराज महाराज यांच्या पालखीचा ‘काका-पुतणे भेट सोहळा’
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – यावर्षीपासून लोणंद (जि. सातारा) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालख्यांची अधिकृत ‘काका-पुतणे भेट’ होणार असून, हा भक्तिरसात न्हालेला सोहळा येत्या २७ जून रोजी पार पडणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाने वारकरी संप्रदायात आनंदाची लहर उमटली आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या संजीवन समाधीवेळी खिरापतीचे कीर्तन…
कोरेगाव भीमा येथील लॉजमध्ये शिक्रापूरच्या तरुणाची आत्महत्या
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका लॉजमध्ये अमोल शिवाजी आढाव (वय २९, रा. २४ वा मैल, शिक्रापूर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १७ मे) सकाळी उघडकीस आली असून आत्महत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.१६ मे) कोरेगाव भीमा येथील हॉटेल जनता लॉजमध्ये थांबलेला होता. शनिवारी सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा…
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती
पुणे – पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या नेतृत्वात मोठा बदल झाला असून, संदीपसिंग गिल यांनी नवे पोलिस अधीक्षक (SP) म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या कार्यकाळाकडून कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार, गिल यांची बदली ५ सप्टेंबर २०२४ रोजीच निश्चित झाली होती. मात्र, तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बदलीविरोधात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात…
विनोदी कीर्तनकार ह. भ. प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन
सोलापूर –ज्येष्ठ कीर्तनकार, समाजप्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे लोकप्रिय प्रचारक ह. भ. प. मधुकर महाराज गिरी (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात आणि कीर्तन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पशा आजारामुळे त्यांना सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर महाराज गिरी हे सोलापूर…
“दूरदृष्टी, संघर्ष आणि यश” – सरपंच संदीप ढेरंगे यांनी लिहिली कोरेगावच्या जलक्रांतीची नवी गाथा!
कोरेगाव भिमा पाणी योजनेला अखेर चालना, ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – “आमची एकी, आणखी बरेच काम बाकी” या कृतीशील विचाराने प्रेरित होऊन आदर्श सरपंच संदीप ढेरंगे व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव भिमा गावाच्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर निर्णायक मार्ग काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत वनविभागाची कोट्यावधी…
