चाकण जवळील खराबवाडी येथील शिक्षकाचा प्रताप
चाकणलगतच्या खराबवाडी येथील खाजगी कोचिंग क्लासेस घेणाऱ्या सुशील पुंडलिकराव कुन्हेकर या शिक्षकाने स्वतःच्या खासगी शिकवणीत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीशी व तिच्या दोन अल्पवयीन मैत्रिणींशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संतप्त पालक व ग्रामस्थांनी संबंधित शिक्षाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.(After the shocking incident of Sushil Pundalikrao Kunhekar, a teacher who teaches private coaching classes in Kharabwadi near Chakan, engaging in indecent behavior with a 20-year-old student and her two minor friends who came to study in his private tutoring, was revealed, angry parents and villagers handed him over to the police, demanding punishment.)
खराबवाडी येथे जुलै २०२४ पासून आजपर्यंत हा प्रकार सुरू होता. या शिक्षकाला गावातील नागरिकांनी बेदम चोप देऊन त्याला महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. महाळुंगे पोलिसांनी सोमवारी (दि. २५) रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुशील पुंडलिकराव कुडेकर (रा. खराबवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. वीस वर्षीय तरुणीने याप्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
महाळुंगे इंगळे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खराबवाडी येथे एस. के. कोचिंग क्लासेस नावाने खासगी शिकवणी घेणारा सुशील कुन्हेकर याने पीडित फिर्यादी विद्यार्थिनीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावरच हा शिक्षक थांबला नाही तर त्याने फिर्यादी विद्यार्थिनीच्या अल्पवयीन मैत्रिणी यांनाही अश्लील क्लीप दाखवून सलगी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यावर संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी नराधम शिक्षकाला बेदम चोप दिला व त्याला महाळुंगे इंगळे पोलिसांच्या ताब्यात दिले.